महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी महाराष्ट्राची माफी मागावी

Supreme Court : सावरकरांविषयी बोलताना काळजी घ्या

Author

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींनी संपूर्ण देश आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अशी तीव्र मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून चांगलाच धडा मिळाला आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दांत राहुल गांधींना फटकारले आहे. यातच आता सत्ताधारी पक्षाकडून माफीचा आवाज उठत आहे. आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर चित्र वाघ आणि आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधींना सुनावले आहे. बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित केला.

सावरकरांच्या निंदेला महाराष्ट्र कधीही क्षमा करणार नाही. राहुल गांधींनी जेव्हा जेव्हा सावरकरांचा अपमान केला, तेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. शेगावमध्ये आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना मिठी मारली हा अपमान महाराष्ट्र कधी विसरणार नाही. बावनकुळे पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावल्यावर तरी त्यांचे डोके ठिकाणावर येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सावरकर म्हणजे काय, याची जाणीव आता तरी त्यांना होईल. देश आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अशी आमची ठाम मागणी आहे. कोर्टाने सांगितले राहुल गांधींना सांगितले की स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध अशा प्रकारची भाषा आता सहन केली जाणार नाही.

Eknath Shinde : शुभेच्छांचे मुखवटे, नाराजीचे वारे

अकोल्यातून वादाची ठिणगी

भविष्यात अशी पुनरावृत्ती झाल्यास, कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम इशाराही न्यायालयाने दिला आहे. या घडामोडींवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तिखट प्रतिक्रिया देत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. तर भाजपच्या ज्वालामुखीसम नेत्या चित्रा वाघ यांनीही काँग्रेसच्या इतिहासबद्दलच प्रश्न उपस्थित करत, राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. ही संपूर्ण वादाची ठिणगी अकोल्यात 17 नोव्हेंबर 2022 रोजी पेटली होती. भारत जोडो यात्रेतील एका सभेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बेजबाबदार विधान केले होते. त्यावरून त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू झाली होती.

सर्वोच्च न्यायालयाने सध्या या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे. परंतु न्यायालयाने स्पष्ट शब्दांत राहुल गांधींना समजावले, स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करू नका. देशाच्या इतिहासाची माहिती नसेल तर असे बेजबाबदार विधान करू नका. तुम्ही एका मोठ्या राजकीय पक्षाचे नेते आहात, त्यामुळे तुमच्या शब्दांना वजन आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्थान किती पूजनीय आहे, हेही त्यांनी लक्षात ठेवावे, असे न्यायालयाने बजावले. वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधींचे समर्थन करत सांगितले की, राहुल गांधींनी समाजात तेढ पसरवण्याचा कोणताही गुन्हा केलेला नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भाषेने स्पष्ट केले आहे की, देशाच्या वीर स्वातंत्र्यसैनिकांविषयी बोलताना प्रत्येक शब्दाची काळजी घेणे आवश्यक आहे.

Pyare Khan : मोदी देश जोडताहेत नितेश राणे देश फोडताहेत

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!