महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : विकासाच्या गतीत ‘पाणी’च राहिलं मागे 

Pench Project : सात उपसा सिंचन योजनांना तातडीने गती देण्याचे निर्देश

Author

पेंच सिंचन प्रकल्प पूर्ण होऊनही सुमारे 40 टक्के लाभक्षेत्र पाण्याविना कोरडेच आहे, ही गंभीर बाब समोर आली आहे. यावर नाराजी व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात अद्याप पाणी पोहोचत नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला सवाल केला आहे. “जेव्हा प्रकल्प पूर्ण झालेत, तर लाभधारकांपर्यंत पाणी का पोहचत नाही?

नियोजन भवन येथे झालेल्या विभागीय आढावा बैठकीत त्यांनी पेंच प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित सात उपसा सिंचन योजनांना तातडीने गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, पेंच प्रकल्पाच्या जवळपास 40 टक्के लाभक्षेत्रात आजही पाणी पोहोचलेले नाही. टेल एंडवर तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत शेतकरी आणि ग्रामस्थ पाण्याअभावी त्रस्त आहेत. ही परिस्थिती पूर्णपणे अस्वीकार्य आहे.

व्यक्त केली चिंता

संबंधित क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण करून नेमक्या कोणत्या गावांपर्यंत पाणी पोहोचले नाही, याची वस्तुस्थिती अधोरेखित करणारी पाहणी तातडीने करावी, असे आदेश सिंचन अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजनेला पाठींबा देत बावनकुळे यांनी जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यांतील खालावलेल्या भूगर्भ जलपातळीवर चिंता व्यक्त केली. भविष्यातील संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी विहीर पुनर्भरण, नळयोजना पाणी स्त्रोतांची मजबुती, आणि जलसंधारण प्रकल्प यांवर अधिक भर द्यावा, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Devendra Fadnavis : ‘सर्किट’च्या वेगाने होणार जाणता राजाच्या पराक्रमांचे दर्शन 

नागरिकांच्या सेवांसाठी प्रशासनाशी थेट संवाद साधण्यासाठी आता नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘संवाद सेतू’ व्हॉट्सॲप चॅटबोटचा क्रमांक सुरू केला आहे. 86694 94944 असा या चॅटबोटचा क्रमांक आहे. याचा अनौपचारिक शुभारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा सहज आणि सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. अमरावती जिल्ह्यात यशस्वी ठरलेला हा उपक्रम नागपूरमध्ये आणखी प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सिसिटिव्हीला प्राधान्य

महानगराच्या सुरक्षेसाठी बसवलेले सिसिटिव्ही कॅमेरे केबल तुटल्याने निष्क्रिय होत आहेत. हे लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी वायरलेस कॅमेऱ्यांचा पर्याय तातडीने स्वीकारण्याचे आदेश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड न करता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी CCTV यंत्रणा उभारावी, असे बावनकुळे म्हणाले. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि पोलीस विभागाने याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

बैठकीत हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दीक्षाभूमीतील सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शासकीय मुद्रणालय व ग्रंथालयाचे स्थानांतरण, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, सामाजिक न्याय विभागातील कन्यादान योजनेचे प्रलंबित अनुदानाची महिती देखील घेतली. छत्रपती शिवाजी महाराज चषक, महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा, मौदा तालुक्यातील क्रीडा संकुल उभारणी आणि कामठी नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांचाही आढावा घेण्यात आला.

नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जलप्रश्न, सुरक्षा व्यवस्था, तंत्रस्नेही सेवा आणि नागरिकाभिमुख प्रशासन यावर पालकमंत्री बावनकुळे यांचा ठाम भर दिसून आला. आगामी काळात या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास नागपूर जिल्हा राज्यात एक आदर्श ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!