भंडारा-गोंदियाच्या राजकारणात प्रचंड वजन असलेले माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे मुख्यमंत्री असल्याचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपचे हेवीवेट नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फके यांनी मंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी आता होत आहे. ओबीसी समाजात प्रचंड नावलौकिक असलेल्या डॉ. फुके यांचा समावेश कॅबिनेटमध्ये असावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या अपेक्षेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार डॉ. परिणय फुके हे मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी नसल्याचे आपल्या काही वाक्यातून दाखवून दिलं.
फडणवीस म्हणाले, ‘डॉ. परिणय फुके यांना सगळे मुख्यमंत्रीच समजतात. त्यांना केवळ मंत्रिपद देणं म्हणजे त्यांचं एकप्रकारे डिमोशनच आहे.’ फडणवीस यांच्या या वक्तव्यानं आता पूर्व विदर्भातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लवकरच डॉ. फुके यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, असे संकेतही फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात देऊन टाकले. त्यामुळे डॉ. फुके हे पुन्हा एकदा मंत्री होणार असल्याचा चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे विधान करण्यामागेही मोठं रहस्य असल्याचं सांगितलं जात आहे.
नीकटवर्तीय सहकारी
आमदार डॉ. परिणय फुके हे देवेंद्र फडणवीस यांच्या नीकटवर्तीयांपैकी एक आहेत. पूर्व विदर्भातील फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून डॉ. फुके यांचं नाव घेतलं जातं. डॉ. फुके हे जरी भंडारा-गोंदियात राजकीयदृष्ट्या कार्यरत असले तरी त्यांचं निवास नागपूर शहरात आहेत. ओबीसींचे आंदोलन, ओबीसी समाजाला भाजपच्या दिशेने झुकविणं अशी मोलाची कामगिरी डॉ. फुके यांनीच बजावली आहे. त्यामुळेच डॉ. फुके यांचा एकही शब्द देवेंद्र फडणवीस खाली जाऊ देत नाहीत, असे वास्तविक चित्र आहे.
सोशल मीडियावर चमकोगिरी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना चाप लावायचा होता. आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर लगेचच सरकारकडून यासंदर्भात आदेश काढण्यात आलेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं न्याय देणारा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. विरोधकांचे हे सर्व मनसुबे डॉ. फुके यांनी उद्ध्वस्त केले आहेत.
Gadchiroli : शिंदे गटाची बैठक झाली, बैठक होताच हाणामारी झाली
खरी किल्ली कुणाकडे?
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक, नोंदणी अभियानातून दोघांना हायजॅक करणं, माजी मालगुजारी तलावांना नवसंजीवनी असा सगळा घटनाक्रम डॉ. फुके यांच्यामुळेच घडला आहे. बोगस डॉक्टरांच्या मुद्द्यावरही ते आक्रमक होते. दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीतही डॉ. फुके यांच्यामुळेच महायुतीनं बाजी मारली. या सगळ्यातून डॉ. परिणय फुके नावाचं नेतृत्व किती सक्षम आहे, हेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वक्तव्यातून सिद्ध केलं.
‘अलीबाबा चालीस चोर’ या चित्रपटातील कथानक जर कुणाला आठवत असेल तर प्रचंड खजिना असलेल्या गुहेचे दार उघडण्यासाठी त्यात एक खास कोडवर्ड होता. ‘खुल जा सिम सिम’ हा तो कोडवर्ड होता. अलीबाबाला हा कोडवर्ड माहिती होता. त्यामुळेच तो सर्वसामान्यांसाठी त्या गुहेतून काही ना काही काढून आणू शकत होता. प्रचंड राजकीय वजन असलेले आमदार डॉ. परिणय फुके यांच्यापाशीही असाच पासवर्ड असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलं. फक्त शब्द वेगळे होते. फडणवीस म्हणाले, ‘डॉ. परिणय फुके यांच्याजवळ मुख्यमंत्र्यांची गुरूकिल्ली आहे.’ यावरून डॉ. फुके मतदारसंघ आणि सामान्यांसाठी काय काय करून घेऊ शकतात, याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच करून दिली आहे.
Devendra Fadnavis : ईमारती नव्हे, भविष्य घडवतोय शिक्षणाचा विठ्ठल