महाराष्ट्र

Devendra Fadnavis : राजकारण थांबवा, महाराष्ट्राच्या जनतेस काय सांगाल?

Monsoon Session : लोकशाहीच्या मंदिरात कलंकी घटना

Author

विधानभवनात झालेल्या हाणामारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत सर्व आमदारांची प्रतिष्ठा धुळीत गेल्याची खंत व्यक्त केली.

महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात घडलेल्या हाणामारीनंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. गुरुवारी (१८ जुलै) या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदवत, ही घटना केवळ एका व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा मुद्दा नसून संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी असल्याचे स्पष्ट केले. ही प्रतिष्ठा कुणा एका आमदाराची नाही, फडणवीस म्हणाले, आज बाहेर ज्या शिव्या दिल्या जात आहेत, त्या केवळ पडळकर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांसाठी नाहीत. त्या प्रत्येक आमदारासाठी आहेत. जनतेमध्ये आमच्याबाबत असे बोलले जात आहे की हे सगळे आमदार माजले आहेत. ही गोष्ट अत्यंत लाजीरवाणी आहे.

हाणामारीच्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात आपले निवेदन मांडले. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उभे राहत दिलगिरी व्यक्त केली. मी अध्यक्षांच्या सूचनांचे पूर्ण पालन करेन. काल जो प्रकार झाला, त्याबद्दल मला खेद आहे, असे पडळकर यांनी नम्रपणे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपले स्पष्टीकरण देताना सांगितले की, नितीन देशमुख हे आपल्यासोबत सभागृहात आले होते असा जो आरोप आहे, तो चुकीचा आहे. मी दररोज एकटाच येतो. मी कुणालाही पासवर सही करत नाही. काल मी तिथे नव्हतोसुद्धा मी मरीन लाईन्समध्ये होतो, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

Monsoon Session : हातवारे झाले वादाचे वारे, आता हात जोडून क्षमायाचना 

अध्यक्षांचा मध्यम मार्ग

जितेंद्र आव्हाड यांनी पुढे बोलताना सांगितले, ही इमारत म्हणजे लोकशाहीचं मंदिर आहे. या मंदिरात जे घडलं, ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी सांगितले की, यावर ते मुख्यमंत्री फडणवीस यांना आधीच माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील शिवीगाळ झाली असून, त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ते म्हणाले, अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या. हे प्रकरण खूप गंभीर आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यात हस्तक्षेप करत सांगितले की, आपण माझ्या दालनात हे सर्व मुद्दे आधीच मांडले आहेत. त्यावर सुरक्षा रक्षकांकडून अहवाल मागवले आहेत.

परंतु जर हा विषय आता राजकारणासाठी वापरायचा असेल, तर ते योग्य नाही. या भूमिकेवर विरोधकांनी आक्षेप घेतला. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी ठाम भूमिका घेत, आव्हाड यांना बोलण्याची मुभा दिली जावी, असे आग्रहाने सांगितले. या सर्व वादविवादाच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा हस्तक्षेप करत स्पष्टपणे सांगितले की, जयंतराव, आपण वरिष्ठ आहात. पण ही घटना सगळ्यांच्याच प्रतिष्ठेला धक्का देणारी आहे. आपण राजकारण करणार आहोत का की थोडं गांभीर्य दाखवणार आहोत? हे लोक काय म्हणत आहेत माहितेय? हे सगळे आमदार माजले आहेत. म्हणून मला सांगायचं आहे, प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय दाखवणार आहात?” असा रोष त्यांनी व्यक्त केला.

Vijay Wadettiwar : लाथा – बुक्क्यांचा नंगानाच, वडेट्टीवारांची अध्यक्षांना हाक 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!