वादग्रस्त विधानांच्या गोंधळात सत्ताधाऱ्यांचे शब्द चर्चेच्या केंद्रस्थानी आले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयम आणि समजुतीचा सूर लावत संतुलित भूमिका घेतली आहे. भाषेच्या या वादळात फडणवीसांचे विधान राजकारणात विवेकाचा ठेवा ठरत आहे.
राजकारणाच्या रंगमंचावर सध्या भाषेचं रण सुरू आहे. मंत्र्यांचे विधान, विरोधकांची टीका, माध्यमांची मथळेबाजी आणि जनतेत निर्माण होणारी संभ्रमावस्था. या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा आवाज समोर आला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. राजकीय गदारोळात त्यांनी वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर एक शांत, समतोल आणि परिपक्व भूमिका मांडत संयमाचे आणि विवेकाचे महत्व अधोरेखित केले आहे.
संपूर्ण प्रकरणाची सुरूवात झाली ती मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाने. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी सहजपणे, परंतु अत्यंत गाजणाऱ्या शैलीत म्हटलं की, निधी मागा, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं? या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि शब्दांच्या या बाणांवर जोरदार टीका केली.
Chandrashekhar Bawankule : 2029 पर्यंत महाराष्ट्र महसूल विभाग ठरेल अग्रेसर
कानाखाली मारण्याची धम
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही एक व्हिडीओ प्रसारित केला ज्यात मंत्री मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला उद्देशून स्पष्ट इशारा देताना दिसतात की, याद राख, मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली घालील आता, आत्ताच बडतर्फ करेन. या शब्दांनी प्रशासनातील भाषा वापराबाबत मोठं चिंतन सुरू झालं.
या दोनही वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका परिपक्व नेत्याप्रमाणे संवाद साधला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, मंत्री अनेकदा भाषणात गमतीने बोलतात. प्रत्येक गोष्टीचा बाऊ करणं योग्य नाही. काही विधानं महत्त्वाची असतात, काही चुकीचीही असतात, पण प्रत्येक वक्तव्यावर राजकीय वादंग निर्माण करणं टाळायला हवं.
गैरसमज वाढू नये
फडणवीसांनी याच संवादात मेघना बोर्डीकर यांच्याशी देखील बोलणं झाल्याचे सांगितलं आणि माध्यमांवर आरोप केला की, त्यांचं बोलणं अर्धवट दाखवण्यात येत आहे, त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला नसला, तरी या मुद्यावर गैरसमज वाढू नये यासाठी समजुतीचा सूर लावला.
संजय शिरसाट यांच्या वक्तव्याबाबतही मुख्यमंत्री फारसे आक्रमक दिसले नाहीत. त्यांनी सांगितलं – “त्यांच्या बोलण्यात फारसं चुकलं नाही, पण सार्वजनिक मंचावर संयम राखणं गरजेचं आहे,” असा अलर्ट त्यांनी शिरसाट यांना दिला. हे वक्तव्य करताना फडणवीसांनी विरोधकांच्या मागण्यांना न धरता, आपल्या मंत्र्यांना सूचनादेखील दिल्या, जे एका जबाबदार नेतृत्वाचं लक्षण आहे.
Amol Mitkari : नागपंचमी संपली खरी, पण आयत्या बिळावर नागोबा डोलतोच
राजीनामाची मागणी
या सगळ्या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, अशा बेजबाबदार विधानांनी मंत्रिपदाची प्रतिष्ठा धुळीला जाते. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनीही खोचक शब्दांत टोला लगावला, “सत्तेची मस्ती डोक्यात गेली की, लोकशाही हरवते,” असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
या घडामोडींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, राजकारणात वक्तव्यं ही तलवारीसारखी असतात. योग्य वापर झाला तर ती लोकहितासाठी वापरली जातात, पण नियंत्रण गमावल्यास ती फटक्यांसारखी समाजात वितंडवाद पसरवू शकतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर शब्दसंयम आणि माध्यमसंयम या दोन्ही अंगांनी विचार करत एक समतोल भूमिका सादर केली आहे. त्यांच्या शांत, परंतु स्पष्ट प्रतिक्रियेमुळे राजकारणातील गोंधळात शहाणपणाचा सूर उमटल्याचं दिसून येतं.
वक्तव्यं म्हणजे फक्त वाक्य नव्हेत, ती जनतेच्या मनात विचारांचं बीज पेरतात. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनीही शब्द वापरताना विवेक आणि मर्यादा पाळणं ही काळाची गरज आहे. फडणवीसांनी दाखवलेला समतोलपणा हीच खरी राजकीय परिपक्वता म्हणावी लागेल. ज्यातून राजकारण ‘खवळलेलं’ नाही, तर ‘सांभाळलेलं’ दिसतं.