महाराष्ट्र

Devendra Fadnavis : पिता म्हणून घेतलेला निर्णय, मुख्यमंत्री म्हणून लाभलेला गौरव

Varsha Bunglow : गृहप्रवेशाच्या पायाघडीत उभ होतं लेकीच्या श्रमांचं सुवर्ण 

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी ‘वर्षा’ बंगल्यात गृहप्रवेश करत भावनिक क्षण साजरे केले. कन्या दिवीजाच्या परीक्षेसाठी घेतलेल्या पित्याच्या संवेदनशील निर्णयाने सर्वांचे मन जिंकले.

राज्याच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला. मात्र या गृहप्रवेशामागे एक खास पार्श्वभूमी होती. गेल्या पाच महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘सागर’ या जुन्या बंगल्यात राहत होते. यामागचं कारण होतं त्यांची कन्या दिवीजा हिची दहावीची परीक्षा. मुलीची परीक्षा असल्या कारणाने आपण वर्षा बंगल्यावर राहायला गेलो नाही. शिवाय तिथे थोडं डागडुचीचं कामही बाकी आहे. त्यामुळे लेकीच्या अभ्यासात अडथळा येऊ शकतो. परीक्षेनंतर मी वर्षा बंगल्यावर राहायला जाणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

मुख्यमंत्री फडणवीस हे केवळ एक जबाबदार नेते नाहीत, तर एक सजग, समर्पित आणि कुटुंबवत्सल पिताही आहेत. हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आपल्या मुलीच्या परीक्षेच्या काळात त्यांनी वर्षा बंगल्याचे प्रवेशाचे औपचारिक क्षण पुढे ढकलून सागर बंगल्यावरच वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला होता. कारण एकच मुलीच्या अभ्यासात कोणतीही अडचण येऊ नये, ती एकाग्रतेने अभ्यास करू शकेल. फडणवीस यांचे हे पित्याचे भान समाजात एक आदर्श ठरते. त्यांची कन्या दिवीजानेही आपल्या यशाने पित्याचा निर्णय सार्थ ठरवत विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचं उदाहरण उभं केलं आहे.

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवण्याचा संकल्प

उंचावली मान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्षा बंगल्यात गृह प्रवेश केला. या आनंदाच्या क्षणी आणखी एक शुभ बातमी मिळाली. या साऱ्या काळात दिवीजानेही आपल्या मेहनतीने आपल्या पालकांचा विश्वास सार्थ ठरवला. मुख्यमंत्र्यांची कन्या दिवीजा हिने दहावीच्या इंटरनॅशनल बोर्ड परीक्षेत तब्बल 92.60 टक्के गुण मिळवत कुटुंबाचे आणि राज्याचेही नाव उज्वल केले. मुंबईच्या फोर्ट भागातील प्रतिष्ठित ‘कैथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल’मध्ये शिक्षण घेतलेल्या दिवीजाने दहावीच्या इंटरनॅशनल बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळवत आपल्या पालकांचा अभिमान वाढवला. अमृता फडणवीस यांनी ही आनंदवार्ता सोशल मीडियावर शेअर केली. वर्षा बंगल्यातील गृहप्रवेशाचे सुंदर क्षणही जनतेसमोर आणले.

घर, कुटुंब आणि जबाबदारी यांचा समतोल साधणं हे अनेकांसाठी कठीण असतं. मात्र फडणवीसांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की राज्याचा विकास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या दोन्ही अगदी प्रेमाने आणि संवेदनशीलतेने पार पाडता येतात. आज वर्षा बंगल्याच्या प्रांगणात केवळ गृहप्रवेश नव्हता. तर एका पित्याने आपल्या कन्येच्या यशाचा आनंद साजरा करत गौरवाच्या नवीन पर्वाची सुरुवात केली. अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी एका यशस्वी नेत्याने आपल्या मुलीच्या यशासोबत आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात केली. हा एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण होता.

Devendra Fadnavis : आरोग्याला आधार देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सज्ज  

अक्षय तृतीयेच्या दिवशी एकीकडे गृहप्रवेशाचा मंगल प्रसंग, तर दुसरीकडे मुलीच्या परीक्षेतील उत्तम यश, अशा दुहेरी आनंदाचा अनुभव फडणवीस कुटुंबाने घेतला. आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस हे केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसून, एक जबाबदार पती, संवेदनशील पिता आणि मूल्यांचा सच्चा प्रतिनिधी म्हणून उभे राहिले आहेत. ‘राजकारण आणि कुटुंब दोघांनाही समान वेळ द्यायचा’ या त्यांच्या निर्णयातून अनेक पालकांना प्रेरणा मिळाली आहे. वर्षा बंगल्याचा दरवाजा आता केवळ राजकीय निर्णयांचा नव्हे, तर एका यशस्वी पित्याच्या प्रेमाचा आणि एका विद्यार्थिनीच्या परिश्रमाचा साक्षीदार ठरला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!