महाराष्ट्र

नागपुरातील दोन्ही Hospital होणार अद्ययावत

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केली पाहणी

Post View : 20

Author

नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे रुग्णांना आणखी सुविधा मिळणार आहे. 

नागपुरातील दोन रुग्णालयांच्या अत्याधुनिकरणाला वेग देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मेयो आणि मेडिकल या रुग्णालयांवर मध्य भारतातील अनेक रुग्णांचा विश्वास आहे. येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. येथील वैद्यकीय सेवा सुविधा वाढविण्याची गरज आहे. अधिकाधिक रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावे, यासाठी विस्तार केला जात आहे. एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ही कामे वेगानं पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) ला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकास कामाचा आढावा घेतला.

नागपुरातील आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार आशीष देशमुख यावेळी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, डॉ. राज गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे आदी यावेळी उपस्थित होते.

गडचिरोलीतून खंडणी गोळा केल्याची Sanjay Raut यांची टीका

झपाट्यानं Development

नागपुरातील विमानतळ आणि दोन रुग्णालयाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. मेयो आणि मेडिकल येथील कामं प्रगती पथावर आहेत. या कामांची सद्य:स्थिती फडणवीस यांनी जाणून घेतली. अधिकाऱ्यांकडून अडी-अडचणी माहिती करून घेतल्या. कामाची गुणवत्ता तपासली. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दोन्ही रुग्णालयांना सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्यात यावी. कॅम्पस परिसर सौर ऊर्जेवर करण्यात यावा. याशिवास प्रस्तावित कामे पूर्ण करावी. त्यानंतरच नवीन कामे सुरू करावी, असे फडणवीस म्हणाले.

मेडिकल व मेयोमध्ये जास्तीत जास्त झाडंही लावण्यात येणार आहेत. सर्व इमारतींमधील प्रसाधन गृहांची देखभाल योग्य करावी. आता दोन्ही रुग्णालयातील कामांचा एप्रिल महिन्यात आढावा घेण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. मेयो आणि मेडिकल येथील कामे निर्देशानंतर किती पूर्ण झाली याचा आढावाही घेण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात पुन्हा हा आढावा घेण्यात येईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं. पुढील बैठकीच्यावेळी कामाच्या स्थितीची माहिती प्राधान्याने घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रकल्पाच्या कामासाठी प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावं असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!