महाराष्ट्र

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवण्याचा संकल्प

Maharashtra : काहीतरी चांगलंही बोला, सामनाच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

Author

1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीसाठी मोठा संकल्प जाहीर केला.

संपूर्ण महाराष्ट्रभर 1 मे रोजी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीशील वाटचालीचा गौरव करत एक ठोस संदेश दिला महाराष्ट्र थांबणार नाही. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र दिन हा केवळ एक सण नाही, तर आपल्या राज्याच्या प्रगतीचा आणि पुरोगामित्वाचा अभिमान साजरा करण्याचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र आहे.

आजही भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. फडणवीसांनी महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवण्याचा संकल्प देखील यावेळी व्यक्त केला. आम्ही संकल्प केला आहे की या महाराष्ट्रात शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवायचा. समावेशक आणि शाश्वत प्रगतीचा मार्ग स्वीकारून, आपण सर्वांनी मिळून विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. या निर्धाराबरोबरच त्यांनी शंभर दिवसांचे कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचेही सांगितले.

Nana Patole : महाराष्ट्राने सुरुवात केली, देशाने पाठिंबा दिला  

यशाची नवी व्याख्या

शंभर दिवसांच्या उपक्रमाचा तपशील लवकरच  अधिकृतपणे जाहीर होणार आहे. फडणवीसांच्या घोषणेमुळे राज्यातील प्रशासन, कर्मचारी आणि जनतेमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या शंभर दिवसांच्या कार्यकाळात विविध प्रशासकीय विभागांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, त्या-त्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं लवकरच घोषित केली जातील. फडणवीस म्हणाले, हे यश केवळ व्यवस्थेचे नाही, तर महाराष्ट्राच्या भावी प्रगतीचे प्रतिबिंब आहे. राज्यात या उपक्रमामुळे गती आणि पारदर्शकता याला प्राधान्य देणाऱ्या कारभाराची पायाभरणी झाली आहे.

सामना मधून विचारण्यात आलेल्या पूर्वीचा कणखर महाराष्ट्र राहिलाय का? या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘काहीतरी ठेवा.. कुठलातरी दिवस आणि कुणाबद्दल विचारता असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीला नतमस्तक होत पुष्पचक्र अर्पण केले. या क्षणी महाराष्ट्राच्या इतिहासातील बलिदानाला आदरांजली वाहत, त्यांनी एकात्मतेचा संदेश दिला गेला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

Parinay Fuke : जनगणनेतून होणार सबका साथ, सबका विकास

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!