मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराजधानी नागपुरातून सत्ताधारी मंत्र्यांच्या बेशिस्त वर्तनावर नाराजी व्यक्त करत त्यांना शिस्तीचा इशारा दिला.
राजकारण म्हणजे एक जबाबदारीचे काम. पण महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी ते गंभीरतेने न घेतल्याचे सध्या दिसतंय. चुकचुकणाऱ्या वादग्रस्त विधानांनी आणि विचित्र कृतींनी सत्ताधारी नेते चर्चेत आहेतच, पण त्यासोबतच सरकारचे खंबीरपणही प्रश्न चिन्हाखाली आले आहे. सामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे. हे राज्य चालवत आहेत की एखादा विनोदी शो?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर या गोंधळावर पडदा टाकण्याचा निर्धार केला आहे. सत्तेतील जबाबदारीचे भान ठेवण्याचे त्यांनी मंत्र्यांना ठणकावून सांगितले आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही.
गरज पडल्यास कारवाई अटळ आहे. सध्या काही मंत्री आपल्या वागणुकीमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि कृतींमध्ये शिस्त आणि जबाबदारीचा अभाव प्रकर्षाने जाणवतोय. मुख्यमंत्री म्हणाले, मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आम्ही तिघांनीही मंत्र्यांना समज दिली आहे. लोक आमचे प्रत्येक पाऊल पाहत असतात. मग ते भाष्य असो, आचार असो किंवा आचरण. त्यामुळे शिस्त राखणे गरजेचे आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त विधान आणि ऑनलाईन गेम खेळतानाचा व्हिडीओ हे सगळं राज्याच्या राजकीय शिष्टाचाराला गालबोट लावणारं होतं. त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची चर्चा रंगत होती. मात्र त्याऐवजी त्यांचे खाते बदलण्यात आले.
Shalartha ID scam : एसआयटीने फोडली शिक्षण विभागाच्या फसव्या तिघांची साखळी
धनंजय मुंडेंची भेट
कृषी खाते त्यांनी गमावले आणि युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय त्यांच्याकडे सोपविण्यात आले. या निर्णयामागे तिघांनी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेली सखोल चर्चा होती, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कृषी मंत्रालय आता दत्ता भरणे यांच्याकडे दिले गेले आहे. सध्या मंत्रिमंडळ विस्तार किंवा इतर कोणत्याही बदलाची चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तिनदा भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. मात्र या भेटी मंत्रिमंडळाशी संबंधित नव्हत्या, हे स्वतः फडणवीस यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या चर्चा मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतो.
मुंडे यांच्या भेटी इतर वैयक्तिक आणि प्रशासकीय कारणांसाठी होत्या, असं त्यांनी सांगून कोणत्याही अफवांना पूर्णविराम दिला. राजकीय चर्चेचा सूर एकदम बदलत, फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. हिंदू टेरर हा शब्द काँग्रेसने आपल्या मतांसाठी निर्माण केला होता, असा आरोप त्यांनी केला. 90 दशकात इस्लामी दहशतवाद जगभर पसरलेला होता. भारतासह अमेरिका, युरोपमध्येही दहशतीची कारवाई चालू होती. पण मतांचा विचार करून काँग्रेसने भगवा दहशतवाद हे जाणीवपूर्वक उभं केलं, असा आरोप त्यांनी केला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर काँग्रेसचे हे प्रयत्न उधळले गेले, असा फडणवीसांचा दावा आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या शब्दांनी देशाच्या सामाजिक ऐक्याला तडा जातो आणि या खेळी देशहिताच्या विरोधात आहेत.
Political War : नऊ सप्टेंबरला मतपेटी बोलेल दिल्ली दरबाराचा ‘नंबर टू’ कोण?