महाराष्ट्र

काँग्रेसचे नागपुरातील प्रवक्ता उखडले Nitesh Rane यांच्या वक्तव्यावर 

मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याची टीका 

Author

भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. 

केरळ मधील वायनाड हे पाकिस्तानसारखे आहे. त्यामुळे तेथून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जिंकून येऊ शकतात. भाजपचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी हे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नवीन वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून नितेश राणे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली.

नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी कर्नाटक राज्याबद्दल आपत्तीजनक विधान केले. केरळ मधील वायनाड हे पाकिस्तानसारखे आहे, असे नितेश राणे यांनी नमूद केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

असे कसे Minister

धर्मांधता व द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची देशात पिछेहाट होत आहे. संविधानाची शपथ घेऊन हे लोक मंत्रिपदाची शपथ घेतात. भारताला अखंड ठेवण्याची ग्वाही देतात. मात्र आता हेच लोक द्वेष पसरवीत आहेत. नितेश राणे यांचे वक्तव्य म्हणजे पसरवणारे आहे. यावर काँग्रेसने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ नितेश राणे यांनी घेतली आहे. त्यानंतर ते केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात. भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना राणे दहशतवादी म्हणतात. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असे अतुल लोंढे म्हणाले.

भारतीय जनता पार्टी नेहमी राष्ट्र प्रथम असल्याचे सांगते. मात्र त्यांचेच नेते देशातील एका भागाची पाकिस्तानशी तुलना करतात. अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? अतुल लोंढे यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. नितेश राणे सारख्या व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार, असा प्रश्नही त्यांनी केला. व्यक्तीगत खर्चाच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राला बिहार व उत्तर प्रदेशच्या बरोबर नेऊन ठेवले आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणा ही गैरभाजपा शासित राज्ये यात दुपटीने आघाडीवर आहेत. भाजपाने महाराष्ट्रात धर्मांधता व द्वेषाचे विष पेरल्याने राज्याची ही अवस्था झाली, अशी टीका लोंढे यांनी केली.

शेतमालाला भाव नाही. एक जात दुसऱ्या जातीविरोधात लढवली जात आहे. बेरोजगारीचे प्रमाण खूप जास्त आहे. महागाई वाढली आहे. हिंदू मुस्लीम तणाव वाढत आहे. राणे यांचे विधान महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित करणारे असल्याचेही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे यांनी नमूद केले. नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!