महाराष्ट्र

काँग्रेसने दिली Nana Patole यांच्या निर्णयाला स्थगिती 

जिल्हाध्यक्ष नियुक्तीला Ramesh Chennithala यांनी केले रद्द 

Post View : 36

Author

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नियुक्तीला रमेश चेन्नीथला यांनी दिली स्थगिती. त्यामुळे आता काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यामध्ये वाद निर्माण होईल का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव लागला. यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक  फटका बसला. कारण काँग्रेसने शंभरहून अधिक जागा घडल्या होत्या. परंतु काँग्रेसने केवळ 16 जागांवरच विजय प्राप्त करता आला आहे. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगल्या होत्या.

विधानसभेत झालेल्या पराभवामुळे नाना पाटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी काँग्रेस मधून नेते करू लागले होते. त्यानंतर आता नाना पटोले यांना काँग्रेसकडून दणका देण्यात आला आहे. काँग्रेसकडून नाना पटोले यांनी नियुक्त केलेल्या जिल्हाध्यक्षाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. खरतर नाना पटोले यांच्या निर्णयाला काँग्रेसने पहिल्यांदाच स्थगिती दिलेली नाही. तर याआधीही 2023मध्ये काँग्रेसने नाना पटोलेंच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

नागपूरला  Chandrashekhar Bawankule देणार एक्स्ट्रा हजार कोटी

केली होती हात मिळवणी

चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून हटविले होते. 2023 मध्ये झालेल्या चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार आणि भाजपच्या पॅनलने हातमिळवणी करत खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनेलचा पराभव केला होता. त्यानंतर पटोले यांनी काँग्रेसचे प्रकाश देवतळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविल होतं. त्यावेळी नाना पटोले यांनी केलेल्या कारवाईला काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी स्थगिती देण्यात दिली होती.

आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबईतील, नांदेड येथील जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली होती. त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी नाना पटोलेंनी केलेल्या नियुक्तीला स्थगिती देत रद्द केल्या आहेत. कारण नवी मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकला आहे. म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना, काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी पक्षातील दोन नानांपैकी एका नानानं 4 कोटींची मागणी केली होती, असा गंभीर आरोप केला होता. रमाकांत म्हात्रे यांच्या याच आरोपामुळे चेन्निथला यांच्याकडून पटोले यानी केलेल्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करताना नाना पटोले यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय रमेश चेन्निथला यांनी घेतला आहे. चेन्निथला यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यामध्ये वाद निर्माण होतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!