बीड मधील घटनेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मुंडे यांच्यावर टीका केली आहे. गरज असेल तर दहा बायका करा, पण कोणाचा खून करू नका, अशा शब्दांमध्ये वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. मस्साजोग येथील vgvccc हत्येनंतर बीडमधील वातावरण तापले आहे. बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वच नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
सर्वपक्षीय मोर्चानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र लागले. महाविकास आणि महायुतीमध्ये फरक आहे. हे महाराष्ट्र विकून खातील. त्यांच्यावर कारवाई होणार नाही. महाराष्ट्रात खुलेआम महिलांचं शोषण होईल.खून करतील तरी कारवाई करणार नाहीत. चित्रा वाघ यांनी प्रचंड विरोध केला. त्यानंतरही संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. पूजा चव्हाणवरुन आरोप झाल्यानंतर आम्ही जरा सुद्धा वेळ घालवला नाही. तातडीने संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून काढले, असे वडेट्टीवार म्हणाले.
Mahayuti महाभ्रष्ट्र
संतोष देशमुख यांचं कुटूंब अजूनही रडत आहे. महिलांच्या शोषनाच्याही अनेक घटना घडल्या आहेत. सरकारने या संदर्भात सीबीआय चौकशी केली पाहिजे. आरोपींना वाचवणारा एक आका आहे. त्यांच्यावर एक बाकी आहे. हा बाका सर्वांना वाचवत आहे. महायुती सरकार आधीपासूनच भ्रष्टाचारी होती. आता हे सरकार अत्याचारी देखील झाले आहे. आरोपी शोधत नाही. मालमत्ता जप्त करत आहे. अद्यापही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची टीम नेमण्यात आलेली नाही. थरमल पॉवरमध्ये खंडणी दिल्याशिवाय कोणीही काम करु शकत नाही. याची सीबीआय चौकशी करा. कोणी कुठेही लपलं तर पोलिस शोधून आणतात. पहिलं आरोपीला अटक करा. अंजली दमानिया म्हणतात त्यात तथ्य असू शकतं. अक्षय शिंदेला मारला कारण मुख्य आरोपीपर्यंत पोहचू नये. तसं यातही तथ्य असू शकतं, असेही वडेट्टीवार म्हणाले.
वाल्मिक कराडला शोधून आणा. नार्को टेस्ट करा. खुनाच्या गुन्ह्यात तो दिसेल. मुलींचे शोषण झाले आहे. त्यातही तो आरोपी दिसेल. मात्र कराडला कोण वाचवत आहे? याचा शोध लागला पाहिजे. पोलिसांनी दोन जणांचे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजे. हे कॉल रेकॉर्ड तपासले तर बीडमधील घटनेमागील खरे गुन्हेगार कोण आहेत? याचा शोध लागेल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. बीड मधील हत्याकांड्यानंतर मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सरकार तातडीने कारवाई करेल, असं वाटत होतं. परंतु सरकारने अद्यापही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सरकार गंभीर नसल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
कायद्यानुसार परवानगी असेल तर दहा बायका करा. परंतु कोणाचा खून करू नका. महायुती सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात बराच फरक आहे. महायुती सरकार महाराष्ट्र विकून टाकेल. आम्ही महाराष्ट्र आणि संविधान वाचवणारे आहोत. त्यामुळे आता तरी सरकारने शहाणे व्हावे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.