
नुकत्याच झालेल्या नागपूर दौऱ्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी वादळ निर्माण करणारे वक्तव्य केले याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी नाव न घेता थेट आरएसएस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
उपराजधानी नागपूरमध्ये नुकतच काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपला पहिला दौरा केला. या दोऱ्यात त्यांनी साधभावना मार्च काढून शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले. काँग्रेसचा जरी मोर्चा आटोपता घेतला गेला असला, तरी त्यावरून सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपांची लाट अजूनही ओसरलेली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस चांगलाच उकळा येत आहे. या वातावरणात सपकाळ यांनी नाव न घेता भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका करत खळबळ उडवून दिली आहे.

सपकाळ यांनी थेट नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव न घेता निशाणा साधला. विषमतेचं बीज पेरणारे विचार नागपूरच्या रेशीमबागेत आहेत, असं स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी निशाणा साधला. नागपूर रेशीमबाग येथे संघाचे स्मृती मंदिर आहे. दुसऱ्याचं घर जळवलं, तर आपलंही घर जळतं, असं सांगत त्यांनी नागपूर दंगलीचं उदाहरण देऊन अप्रत्यक्षरित्या फडणवीसांनाच टोला लगावला. सपकाळ यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यालाही जोड दिली, ते म्हणाले जर नागपूरप्रमाणे मंत्रालयातही लोक घुसले असते, म्हणूनच सरकारने तातडीने मुंडेंचा राजीनामा घेतला.
Devendra Fadnavis : आता अमरावती फक्त शहर नाही, पायलट घडवणारे जागतिक केंद्र
जोशींचे उत्तर
सपकाळांच्या या टीकांनी राज्यातील राजकारणात नवा वाद पेटला आहे. औरंगजेबाच्या कबरीपासून सुरुवात झालेला वाद आता थेट ओबीसी-दलित प्रतिनिधीत्व, मंगेशकर कुटुंब, आणि व्यक्तिशः आरोपांपर्यंत पोहोचला आहे. यातून भाजप नेतेही शांत बसले नाहीत. भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी सपकाळांवर सडकून टीका करत खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या कुलुपाला हात लावायची हिंमत कोणामध्ये नाही, असा संतप्त इशारा त्यांनी दिला.
जोशी पुढे म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दम असेल, तर त्यांनी येऊन हात लावून दाखवावा. आम्ही आहोत बघायला. संदीप जोशी यांचं म्हणणं आहे की, अशा वल्गना करायच्या होत्या, तर त्या आधी करायला पाहिजे होत्या. नागपूरची दंगल ही अवघ्या चार तासांमध्ये आटोक्यात आणली गेली. कोणी ही दंगल घडवली हे सर्वांना माहिती आहे. सपकाळांनी चिथावणीखोर वक्तव्ये करण्यापेक्षा सद्भावनेचा मार्ग घ्यावा. नागपूरमधील हिंसाचाराची धग शमलेली असली तरीही, त्यावरून निर्माण झालेल्या राजकीय उकळ्याने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.
Nagpur : काँग्रेसच्या सद्भावना रॅलीची विदर्भाच्या उन्हानेच केली शांती