महाराष्ट्र

Rajendra Mulak : जुनं प्रेम पुन्हा फुललं, राजकारणातही हृदय जुळलं

Congress : पार्टनरशिप रिन्यू; राजेंद्र मुळक यांची दमदार रीएन्ट्री

Author

काँग्रेसने सहा वर्षांच्या निलंबनानंतर माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना पुन्हा पक्षात सामील केले. ज्यामुळे नागपूरमधील राजकीय वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे.

एकेकाळी दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण होते. पण वेळेच्या वावटळीत नातं तुटलं. विश्वासाला थोडासा तडा गेला. एकमेकांपासून दूर जाताना मनात राग होता, पण कुठे तरी प्रेमही होतंच. मात्र, म्हणतात ना ‘सच्चा प्यार लौटकर जरूर आता है’ इथे झालंही तसंच. नागपूरच्या राजकारणात सध्या प्रेमाची नवलाई फुललेली आहे. काँग्रेस आणि राजेंद्र मुळक यांचं जुनं, पण अधुरं राहिलेलं नातं आता पुन्हा जुळलं आहे. ब्रेकअपनंतर झालेलं हे जोरदार पॅचअप संपूर्ण नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलंय. काँग्रेस म्हणते ‘तू है तो मैं हूं’ त्याला मुळक उत्तर देतात ‘दिल में तुम्हारे रहकर देख लिया’. सहा वर्षांपूर्वी झालेलं हे ब्रेकअप काही फार काळ टिकणार नव्हतंच.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेला मनमुटाव, पक्षाच्या निर्णयाविरोधात घेतलेली बंडखोरीची वाट आणि नंतरचं निलंबन. या सगळ्या गोष्टी आता केवळ भूतकाळातल्या गोष्टी झाल्या आहेत. आता हे नातं नव्याने फुललंय. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या मंचावर ‘घरवापसी’च्या या प्रेमकहाणीचा शेवट सुखद झाला. मुळात या संबंधात दरार काही किरकोळ नव्हती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात मुळक यांनी थेट पक्षाच्या निर्णयाला धक्का देत रामटेक विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली होती.

Bachchu Kadu : मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळो अशी विठोबाच्या दारात प्रार्थना

विश्वास पुनर्स्थापनेचा क्षण

रामटेक हे मतदारसंघ महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे दिले होते. पण मुळक यांना ते मान्य नव्हतं. पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि मग काय, काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत थेट सहा वर्षांसाठी निलंबित केलं. अर्थात, त्यावेळीही त्यांच्या पाठीशी काही काँग्रेस नेते उभे राहिले होते. त्यात सुनील केदार यांचं नाव अग्रेसर होतं. राजकीय पटलावर कुठलीही दरार फार काळ टिकत नाही. विशेषतः निवडणुकींच्या तोंडावर तर नाहीच नाही.

काँग्रेसलाही कळून चुकलंय की, घरातलं माणूस परत आल्यास घर मजबूत होतं. त्यामुळे पक्षाने आपलं मन उघडं करून ‘दिल से माफ किया’ म्हणत जुना राग विसरून राजेंद्र मुळक यांना पुन्हा पक्षात सामील करून घेतले. ही फक्त घरवापसी नाही. ही एका तुटलेल्या विश्वासाची, एका जुन्या प्रेमाची आणि एका नात्याची पुनर्स्थापना आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि मुळक पुन्हा एकत्र आलेत. आता दोघांचं मिशन एकच ‘नागपूर फत्ते करायचं’ राजकीय पंडित सांगतात, ‘प्रेमात भांडणं होतात, पण तुटणं नाही’ हे काँग्रेस-मुळक नातं त्याचं जिवंत उदाहरण आहे.

Parinay Fuke : निराधारांच्या आशेचा किरण पुन्हा उगवला

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!