महाराष्ट्र

Bhandara : नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा सहकारी विजय

Congress : खरेदी-विक्री समितीत एकछत्री राज्य मतदारांचा बदलाचा कौल

Share:

Author

साकोली तालुका सहकारी खरेदी-विक्री समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा गड भेदत जोरदार विजय मिळवला आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन शेतकरी सहकार पॅनलने 15 पैकी 12 जागांवर वर्चस्व मिळवले.

साकोली तालुका सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादित, लाखनीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा गड ढासळवत दणदणीत विजय मिळवला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष व साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वातील परिवर्तन शेतकरी सहकार पॅनलने 15 पैकी तब्बल 12 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. यामुळे काँग्रेसचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व अधिक बळकट झाले आहे.

भाजपच्या दीर्घकाळ चाललेल्या प्रभुत्वावर अखेर पडदा टाकण्यात काँग्रेसला यश आले आहे. ही निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची होती. आमदार नाना पटोले यांनी निवडणुकीपूर्वी मतदारसंघात विविध बैठक घेतल्या, स्थानिक गट-प्रवर्गांच्या प्रमुखांशी संवाद साधला. प्रचाराची काटेकोर रणनीती आखली. परिणामी, मतदारांनी काँग्रेसच्या पॅनलला कौल दिला. एकतर्फी विजयाची नोंद झाली.

Shiv Sena : तेजस्वी घोसाळकर यांचा अचानक राजीनामा

साकोलीत सत्ता परिवर्तन

निवडणुकीने साकोली तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. खरेदी-विक्री समितीवर भाजपचे अनेक वर्षे वर्चस्व होते. मात्र, यंदा मतदारांनी बदलाची गरज ओळखत काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलला संधी दिली. यापूर्वीच विधानसभा निवडणुकीत आमदार पटोले यांना विजयी केल्यानंतर जिल्हा परिषदेतही काँग्रेसने सत्ता मिळवली होती. आता सहकार क्षेत्रातही वर्चस्व मिळवून काँग्रेसने तीनही पातळ्यांवर आपली उपस्थिती ठासून दाखवली आहे.

सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेसने लढा दिला. त्याचे फळ मतदारांनी या विजयाच्या माध्यमातून दिले आहे. हा विजय म्हणजे शेतकरी वर्गाचा काँग्रेसवरील विश्वास आहे, अशी भावना मतदारांमध्ये दिसून आली. वैयक्तिक गटात जगन्नाथ कापसे, मार्कंड भेंडारकर, ईश्वरदत्त गिरेपुंजे, जयकृष्ण फेंडरकर, नरेंद्र झलके, खेमराज समरीत हे विजयी झाले आहेत. महिला गटातून अश्विनी भिवगडे व अनिता बोरकर यांनी यश मिळवलं. विशेष मागास प्रवर्गातून नामदेव राऊत, अनु. जाती-जमाती गटातून सचिन बागडे, ओबीसी गटातून महादेव गायधने आणि संस्था प्रतिनिधी गटातून विजय कापसे हे विजयी ठरले.

Super Speciality Hospital : अमरावती बनणार अवयव प्रत्यारोपणाचं हब 

ग्रामीण मतांचा कौल

सर्व संचालक ग्रामीण भागातील शेती, अर्थकारण आणि सहकाराच्या गरजा जाणणारे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी हे संचालक ठोस निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. शेतकरी, मजूर आणि ग्रामीण जनतेच्या हक्कांसाठी काँग्रेसने नेहमी लढा दिला आहे.

भाजपच्या सत्तेत असतानाही खरेदी-विक्री समितीसारख्या संस्थेवर काँग्रेसचा विजय म्हणजे लोकांचा आमच्यावरचा विश्वास आहे. आम्ही हा विश्वास सार्थ ठरवू, असा विश्वास आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला. या विजयामुळे साकोली तालुक्यातील राजकारणात काँग्रेसचा पुन्हा एकदा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहकार क्षेत्रातील या विजयाचा प्रत्यक्ष परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावरही जाणवेल, असे संकेत मिळत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!