महाराष्ट्र

Akola : दादांनी वाळलेली झाडं पाहिली अन् अख्ख्या यंत्रणेला पाणी पाजलं 

Ajit Pawar : कामांचा दर्जा आणि वेळेची अचूकता यावर टोकाचा भर 

Post View : 1

Author

अकोला जिल्ह्याच्या विकास आराखड्याचा आढावा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला ठणकावून आदेश दिले. निधीचा अपव्यय न होता, 2025-26 पर्यंत सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण करा, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार 12 दोन रोजी अकोला आणि वाशीम (खामगाव) दौऱ्यावर होते. पवार यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या विकास योजनांचा सखोल आढावा घेतला. अकोल्यात पवार यांनी बैठकीत स्पष्ट शब्दांत सांगितले की, 2025- 26 आर्थिक वर्षात एकाही निधीचा अपव्यय होऊ नये आणि कुठलाही निधी अखर्चित राहता कामा नये. त्यांनी फेब्रुवारीपर्यंत सर्व नियोजित कामे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. गुणवत्तेवर भर देताना अनावश्यक खर्चांना चाप बसवण्याचं आदेश दिलं.

अजित पवार अकोला आणि वाशीम जिल्ह्यांच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नियोजन भवनात आले होते. या दौऱ्यात त्यांनी एकामागून एक मुद्द्यांवर नेमकेपणाने भाष्य करत अधिकार्‍यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. पवार यांनी स्पष्ट सांगितलं की जिल्हा नियोजन समितीचा निधी योग्य आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च व्हावा. कामं ही प्रत्यक्ष जमिनीवर उतरणारी हवीत. केवळ कागदोपत्री योजना दाखवून निधीचा अपव्यय झाला, हे मान्य करता येणार नाही.

कार्य पूर्ण करा

उपमुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना सूचित केलं की, नियोजित कामे फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण व्हायला हवीत. कोणतीही टेंडर प्रक्रिया रखडू नये, अंमलबजावणीत विलंब नको, यासाठी प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अकोल्याच्या विमानतळासाठी देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी महत्त्वाची ग्वाही दिली. नाइट लँडिंगची सुविधा, धावपट्टीचा विस्तार आणि रुंदीकरणाचे काम लवकर मार्गी लावणार. ही ग्वाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोल्यातील आधीच दिलेल्या आश्वासनाला पाठबळ देत दिली.

यावेळी खरीप हंगामाशी संबंधित विषयांवरही चर्चा झाली. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, बियाण्यांचा पुरवठा, पाणी आणि वीज यंत्रणा यांची अंमलबजावणी याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय यंत्रणा, औषधांचा साठा, डॉक्टर व स्टाफची उपलब्धता यावरही त्यांनी सखोल माहिती घेतली. अनावश्यक खरेदी आणि निधीचा चुकीचा वापर यासंदर्भात त्यांनी रोष व्यक्त करत, पैसा तिथं खर्च करा जिथं गरज आहे, असा स्पष्ट संदेश दिला.

Akola : अजित पवारांचा जिल्हा प्रशासनाला चिमटा; निधीचा अपुरा वापर

सर्वसमावेशकतेचा मंत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘बेरजेचे राजकारण’ हेच पक्षाचं ब्रीद असल्याचं ठामपणे सांगितलं. जात-धर्म न बघता सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. फक्त जुन्यांनाच नाही, नव्यांनाही संधी हवी; कारण काम करणाऱ्यालाच राष्ट्रवादी पक्षात स्थान आहे, असं सांगत त्यांनी अमोल मिटकरी यांना आमदारकीची संधी दिल्याचा दाखला दिला.

कार्यक्रमात माजी महापौर मदन भरगड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावर बोलताना पवार म्हणाले, आगीतून बाहेर पडलात, आता फुफाट्यात जाऊ देणार नाही. त्यांच्या 21 वर्षांच्या महापालिका अनुभवाला सलाम करत, पुढील महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस किंगमेकर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संपूर्ण दौऱ्यात नेमकेपणाने विश्लेषण करणाऱ्या अजित दादांचा संताप मात्र उसळला. जेव्हा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचताना रस्त्यालगत वाळलेली कुंड्यांतील झाडं पाहिली. त्या अधिकाऱ्यांना खडसावत ते म्हणाले, हे सुधारणार नाहीत, ही केवळ झाडांची नाही, तर एकंदर प्रशासनाच्या कार्यपद्धतीची चपराक होती.

अभिजित कराळे | Abhijeet Karale

अभिजित कराळे | Abhijeet Karale

पत्रकारिता, बातम्या हा अभिजित यांच्या आवडीचा विषय. पत्रकारितेचा कोर्स केला नसला तरी त्यांनी न्यूज रिपोर्टिंगच्या आवडीतून त्यांनी आपलं लेखन कौशल्य विकसित केलं. ‘द लोकहित लाइव्ह’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेतील आपला प्रवास सुरू केला. पुण्यातून त्यांनी संगणशास्त्र, वेब डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!