महाराष्ट्र

Navneet Rana : थोड्याच दिवसांची मेहमान, लवकरच उडवून टाकू 

Death Threat : नवनीत राणा यांना आली जीवे मारण्याची धमकी

Author

माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, ‘लवकरच उडवून टाकू’ असा संदेश देण्यात आला आहे. हनुमान चालीसा पठणामुळे चर्चेत आलेल्या राणा यांना सतत अशा धमक्या मिळत असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

अनेकदा अतिरेक्यांच्या आणि देशविरोधी मानसिकतेच्या लोकांच्या रडारवर आलेल्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवाला धोका निर्माण झाला आहे. याआधीही धमक्यांना सामोरे गेलेल्या राणा यांना पुन्हा पाकिस्तानातून जीव घेण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा संशय राणा यांनी व्यक्त केला जात आहे.

अज्ञात व्यक्तीने नवनीत राणा यांना ‘हनुमान चालीसा वाचणारी हिंदू शेरनी आता थोड्याच दिवसांची मेहमान आहे, लवकरच उडवून टाकू’, असा धक्कादायक मजकूर पाठवला आहे. हे धमकीचे मेसेज पाकिस्तानमधील विविध मोबाईल नंबरवरून पाठवले जात असून, या प्रकाराने सुरक्षाव्यवस्थेचे धाबे दणाणले आहेत. नवनीत राणा यांनी तातडीने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना यासंदर्भात माहिती दिली असून, तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

पुन्हा टार्गेट

नवनीत राणा यांना धमक्यांचा हा पहिलाच प्रसंग नाही. ऑगस्ट 2023 मध्ये अमरावतीतील एका व्यक्तीने फोनवरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर मार्च 2025 मध्ये पाकिस्तानातून पुन्हा एकदा धमकी आली आणि राजापेठ पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली होती. सप्टेंबर 2024 मध्ये नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या अमरावतीतील निवासस्थानी एक पत्र आले होते. या पत्रात ‘आमिर’ नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होता आणि नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती.

Ravikant Tupkar : दुधाने झुकवले सरकार, आता भाजीपालाही थांबवणार 

रोखठोक इशारा

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुलेआम कौतुक करत नवनीत राणा म्हणाल्या, घर में घुसकर मारा है, कबर तुम्हारी खोदी है. देश की गद्दी दिल्ली पर बाप तुम्हारा मोदी बैठा है. बकरी की अम्मा कब तक खैर मनायेगी. चुन चुन कर मारेंगे. त्यांच्या या वक्तव्याने काही कट्टर विचारसरणीच्या लोकांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच राणा यांना पुन्हा टार्गेट केलं जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या धमक्यांनंतर नवनीत राणा यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी या धमक्यांची गांभीर्याने दखल घेतली असून, पाकिस्तानातून येणाऱ्या संदेशांचा शोध घेण्यासाठी सायबर क्राईम यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच राणा यांची वैयक्तिक सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

नवनीत राणा यांनी अनेकदा धाडसी भूमिका घेतल्या आहे. विशेषतः हनुमान चालीसा पठणाच्या प्रकरणामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांची राष्ट्रभक्ती आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे त्यांना अनेकदा टार्गेट करण्यात आले आहे. नवनीत राणा यांच्याविरुद्ध सुरू असलेला धमक्यांचा सिलसिला केवळ त्यांच्या राष्ट्रवादी भूमिकेचा परिणाम आहे का? की ही एक मोठी कटकारस्थाने? हे तपासाअंती स्पष्ट होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!