महाराष्ट्र

Akola Politics : झाकली मूठ सावध जनतेपुढे उघडली 

Mahayuti : विकासाच्या रस्त्यावर बदनामीचा डाव 

Share:

Author

लोकप्रियतेच्या झगमगाटात हरवलेले काही नेते आता खोट्या आरोपांच्या पायावर गाजराचा बांग घालून महायुतीवर वार करत आहेत. परंतु सुजाण जनतेसमोर विकासाची सत्यकथा उजळत असून, दिशाभूल करणाऱ्या या प्रयत्नांची पोलखोल होत आहे.

‘आपल्याकडे न करता येणारे काम इतरांवर झाकण्यासाठी खोट्या आरोपांची सुपारी,’ अशा शब्दांत भाजप महानगर सरचिटणीस अ‍ॅड. देवाशीष काकडे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला. अकोला पश्चिम मतदारसंघात जनतेचा विश्वास गमावल्याने निराश झालेल्या नेत्यांकडून जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्यावर खोटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे.

अकोला जिल्ह्यातील शेगाव-बाळापूर रस्ता खराब असल्याच्या कारणावरून एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांवर टीका करण्यात आली. परंतु यामागे एक फार मोठा राजकीय अजेंडा असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “शेगाव मतदारसंघ कोणाचा आहे हे माहिती नसलेल्या लोकांनी केवळ लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या खोट्या आरोपांची नौटंकी मांडली आहे.

मंत्र्यांकडून मंजुरी

नितीन गडकरींच्या पुढाकारामुळे रस्त्याचे काम मंजूर अ‍ॅड. काकडे यांनी स्पष्ट केले की, पातुर ते शेगाव या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल आणि आमदार डॉ. संजय कुटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडून मंजुरी मिळवली आहे. सध्या या रस्त्याचे टेंडर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे काम लवकरच सुरू होणार आहे.

वास्तविकतेपासून दूर, राजकीय स्टंटबाजीचा प्रकार अकोला पश्चिममध्ये मतदारांचा पाठिंबा गमावलेल्यांनी आता काँग्रेसला मदत करत, महायुतीवर आरोप करून खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करत काकडे म्हणाले, लोकांना सत्य माहिती आहे. कोण काय काम करतं, आणि कोण निव्वळ घोषणांचं राजकारण करतं, हे जनता ओळखते.

सेवेसाठी लागते कृती

त्यांनी पुढे सांगितले की, ज्या नेत्यांनी लाडकी बहिण योजना आणि वक्फ बोर्ड समर्थनावर विरोध केला, कोर्टात गेले, त्यांना जनतेने नाकारले. आता तेच पुन्हा जनतेच्या भावनांशी खेळत आहेत. वखोटं हिंदुत्व आणि बनावट श्रेय’, जनता आता सावध असल्याचे देवाशिष काकड म्हणाले. काकडे यांनी स्पष्ट केले की,

राजकारणात तथ्य, अभ्यास आणि जनतेच्या सेवेसाठी कृती लागते. केवळ पत्रकं काढून आणि इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लोकांना भुलवता येत नाही. अकोला जिल्ह्याची जनता सुजाण आहे, आणि कोणाचा अजेंडा काय आहे हे ती चांगले ओळखते.

महायुतीच्या विकासकामांवर जनता विश्वास ठेवते महायुती सरकारच्या माध्यमातून रस्ते, सिंचन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय अपयश झाकण्यासाठी केलेले हे खोटे आरोप म्हणजे ‘लोकप्रियतेच्या चविष्ट शिळोप्याचं राजकारण’ असल्याचे स्पष्ट करत, अ‍ॅड. काकडे यांनी हे सर्व प्रकार निंदनीय व दिशाभूल करणारे असल्याचं ठामपणे सांगितलं.

एकूणच, अकोल्यात सध्या राजकारणाचा झगमगता रंगमंच सजला असला तरी, सत्याच्या प्रकाशात उभं असलेलं महायुतीचं काम अधिक ठळकपणे समोर येत आहे. खोट्या प्रचाराच्या सावल्यांना जनता सहज पारखते आणि विकासाच्या वाटेवर साथ देत राहते, हेच या सर्व गोंधळातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!