महाराष्ट्र

Deven Bharti : अकोल्यात कार्यकाळ गाजवणारे झाले मुंबईचे पोलीस आयुक्त

Mumbai : मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आता राज्याची राजधानी सुरक्षित ठेवणार

Author

महाराष्ट्र अँटी टेररिझम स्क्वॉडचे नेतृत्व करणाऱ्या देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महामुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट घडला आहे. ज्यात देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त असलेल्या देवेन भारती यांची ही नियुक्ती विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर झाली आहे. 30 एप्रिल 2025 रोजी फणसाळकर निवृत्त झाले होते. त्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची धुरा देवेन भारती यांच्याकडे देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून भारती यांची नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी अकोला पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

अकोला जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या दंगलींना थांबवून, तेथील शांतता कायम ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुंबईचे पोलीस आयुक्त पद हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाला समकक्ष आहे. मुंबईतील 26/11  दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारती यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा होता. ताज हॉटेलवरील हल्ल्यात त्यांनी चोख मुकाबला करत मुंबईची सुरक्षा सुनिश्चित केली. त्यांची भूमिका या हल्ल्याच्या निवारणात एक महत्त्वाचे पाऊल ठरली. त्यांनी महाराष्ट्र अँटी टेररिझम स्क्वॉडचे प्रमुख म्हणूनही कार्य केले.

Atul Londhe : फुलेंना आता तरी बेडीमुक्त करा

नवीन भूमिका

राज्यातील इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे जाळे त्यांनी उलगडले. या कामामुळे ते दहशतवाद विरोधी मोहिमेतील एक अवघड आणि महत्वाची व्यक्ती म्हणून ओळखले जातात. भारती यांचा पोलीस खात्यातील प्रवास त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध महत्त्वाच्या प्रकरणांतील योगदानामुळे त्यांची नियुक्ती आणखी महत्त्वाची बनली आहे. देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा संबंध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खूप जवळचा आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात, भारतींना पोलीस सहआयुक्त म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी दिली गेली होती.

भारतींना अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती देऊन एटीएसमध्ये पाठवले गेले. फडणवीस यांचा विश्वास त्यांच्यावर नेहमीच होता. त्यांची कार्यक्षमता त्याच प्रमाणे उंचावली आहे. त्यानंतर भारतींवर काही आरोपही झाले, जसे की दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध असण्याचा आरोप. पोलीस तपासांमध्ये याबाबत कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. 2022 मध्ये राज्य सरकारने या आरोपांवर चौकशी अहवाल फेटाळून टाकला. देवेन भारती यांनी आता मुंबई पोलीस आयुक्त म्हणून मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी घेतली आहे.

Nagpur : कन्हानमध्ये प्रशासन झोपेत, माफिया फुल ड्युटीवर

कार्यक्षमतेची खात्री

मुंबईतील मोठ्या शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संरक्षणासाठी त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. खूपच गुंतागुंतीचे गुन्हे, दहशतवादी हल्ले आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोके यांच्यासोबत त्यांनी काम करावे लागेल. भारती यांच्या कडून मुंबईतील नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल, अशी अपेक्षा आहे. 26/11 हल्ल्यात, मिड डे वृत्तपत्राच्या पत्रकार जे. डे यांच्या हत्येच्या तपासात आणि अनेक हाय-प्रोफाइल गुन्ह्यांमध्ये त्यांनी जी भूमिका बजावली, त्यावरून मुंबईतील जनतेला त्यांच्या कार्यक्षमतेची खात्री आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!