महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची वाणी, मिळणार विदर्भाच्या घशाला पाणी

East Maharashtra : नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळावर कायमस्वरूपी मात  

Post View : 58

Author

विदर्भ आणि मराठवाड्यातील कायमस्वरूपी दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वैनगंगा-नळगंगा आणि गोदावरी नदीजोड प्रकल्पांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी मुबलक प्रमाणात मिळणार आहे, अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, शेती उत्पादनात मोठी वाढ होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, विदर्भ हा कायम दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. अकोला, बुलढाणा, अमरावती आणि मेळघाट यासारख्या भागांना दरवर्षी पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, नदीजोड प्रकल्पांमुळे आता या भागातील घशाची कोरड कायमस्वरूपी मिटणार आहे.

Shiv Sena UBT: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाचा गेमप्लान

खारपाणपट्ट्याला दिलासा

विदर्भात मोठ्या प्रमाणात खारपाणपट्टा आहे. ज्यामुळे पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम शेतीवर होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होईल आणि खारपाणपट्ट्याचा विस्तार कमी होईल. परिणामी शेतीयोग्य जमीन तयार होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

गोदावरी जलप्रकल्प आणि वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हे राज्यातील सर्वांत महत्त्वाचे जलसंधारण प्रकल्प ठरणार आहेत. या प्रकल्पांद्वारे विदर्भ आणि मराठवाड्यातील कोरडवाहू भागांना भरपूर पाणीपुरवठा होईल. यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुष्काळावर मात करायची असेल तर पाणी साठवणे आणि वाहून नेणे हेच उपाय आहेत. या दोन्ही नदीजोड प्रकल्पांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा इतिहासजमा होईल.

Maharashtra : देवाभाऊंच्या राज्यात ‘महसूल’ची ‘एक खिडकी’

आनंद गगनात मावेनासा

या निर्णयामुळे विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मेळघाट, बुलढाणा, अकोला या भागांतील शेतकऱ्यांना आता आपल्या शेतीसाठी वर्षभर पाणी मिळणार आहे. अनेक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या प्रकल्पांची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्पासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजना, कालव्यांचे काम आणि जलसाठा निर्मिती यासोबतच तांत्रिक सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा दृढनिश्चय

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाम शब्दांत सांगितले की, विदर्भ आणि मराठवाड्याचा दुष्काळ हा आता फक्त इतिहास होणार आहे. आमचा निर्धार आहे की, पाण्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ येऊ द्यायची नाही.

नदीजोड प्रकल्प हा विदर्भ आणि मराठवाड्यासाठी संजीवनी ठरणार असून, शेती, पशुपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यामध्ये मोठी क्रांती घडणार आहे. आता विदर्भातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी दिसणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!