
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय राजकारण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवतीभवती फिरतांना दिसत आहे. मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल? गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा अधिकच रंगू लागली होती. विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दावा केला की मोदींचा वारसदार महाराष्ट्रातूनच येईल. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला पूर्णविराम देत थेट उत्तर दिले आहे. 2029 मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील.
भाजपामध्ये 75 वर्षीय स्थापना निवृत्तीचा नियम असल्याचे बोलले जात असल्याने ही चर्चा अधिकच तापली होती. राजधानीत आयोजित इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट 25 चर्चासत्रात देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीपासून ते मुंबईच्या विकासाच्या दृष्टीकोनावर त्यांनी विस्तृत चर्चा केली. त्यांनी सांगितले की, दावोसमध्ये झालेले करार मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात येत आहेत. महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

भारताची परंपरा
येत्या काही वर्षांत राज्याच्या विकासात मोठी वाढ होईल. मात्र, या कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना सर्वात जास्त विचारला गेलेला प्रश्न विचारण्यात आला. 2029 मध्ये नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण असेल? यावर त्यांनी पुन्हा एकदा जोर देत स्पष्ट केले. कोणताही वारसदार शोधण्याची गरज नाही. फडणवीसांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले, भारताची परंपरा आहे की जेव्हा वडील जिवंत असतात, तेव्हा वारसदार ठरवला जात नाही. ही मुघली संस्कृती आहे, आमची नाही.
नरेंद्र मोदीच 2029 मध्ये पंतप्रधान असतील ते सक्षम आहेत, देशाचे नेतृत्व पुढील अनेक वर्षे करू शकतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची किंवा वारसदाराच्या शोधाची कोणतीही गरज नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाच्या अंतर्गत गोटातही स्पष्ट संदेश गेला आहे की पक्षाची 2029 निवडणूकसुद्धा मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाणार आहे. भाजपाचा 75 वर्षे निवृत्तीचा नियम मोदींसाठी लागू होईल का. यावर फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा कोणत्याही गोष्टीला स्थान नाही.
पंतप्रधानांचा निर्धार
मोदींनी स्वतःच 2029 मध्ये पुन्हा एकदा नेतृत्व करण्याचा निर्धार केला आहे. 2024 लोकसभा निवडणुकपूर्वीच मोदी यांच्या वयाबाबत आणि भाजपाच्या नियमांविषयी चर्चा सुरू झाली होती. 2029 मध्ये मोदी 78 वर्षांचे असतील. त्यामुळे नव्या पिढीला संधी मिळावी, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे की मोदी यांच्यासारख्या सक्षम नेत्याला निवृत्तीच्या नियमात अडकवणे योग्य ठरणार नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेवर पडदा टाकत स्पष्ट संदेश दिला आहे. मोदी अजून बराच काळ देशाचे नेतृत्व करणार आहेत. 2029 मध्येही तेच भाजपाचे चेहरा असतील. त्यामुळे सध्या वारसदार कोण? यावर चर्चा करणे म्हणजे उगाच वाऱ्याशी झगडण्यासारखे आहे. राजकीय वातावरण कितीही तापले तरी भाजपासाठी एकच स्पष्ट आहे, अबकी बार 2029 में भी मोदी सरकार. फडणवीसांच्या या उत्तरावर आता विरोधक काय उत्तर देतात, यावर सर्वांचे लक्ष आहे.