
महाराष्ट्र सदन हे नवी दिल्लीतील महाराष्ट्राचे अधिकृत राज्य अतिथीगृह म्हणून काम करते. दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडले. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर बीड येथील सरपंचाच्या हत्ती प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा बाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद होत आहे की दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज गुरूवार 30 जानेवारीला महाराष्ट्र सदन याठिकाणी आपण केलेलं आहे. हे जे साहित्य संमेलन होतंय, जगभरातील मराठी माणसाकरिता एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की, देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्यदिव्य अशा प्रकारचे हे साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाकरिता एक मोठी संघटना या ठिकाणी सातत्याने काम करते. जवळपास 70 लोक या ठिकाणी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पोलिस महासंचालक Rashmi Shukla देणार राजीनामा ?
मोदींनी दिला होकार
फडणवीस पुढे म्हणाले की, मुरलीअण्णा मोहोळ हे आपले कार्यवाह म्हणून जी काही मदत आहे, त्या ठिकाणी ती मदत करत आहेत. मला विश्वास आहे की, अतिशय चांगलं साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होणार. दिल्लीतील साहित्य संमेलन हे यशस्वीच झालंच पाहिजे. या दृष्टीने आम्ही सगळे देखील त्यांच्या पाठीशी आहोत. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या साहित्य संमेलनामध्ये येण्याकरिता होकार दिलेला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अतिशय भव्य अशा प्रकराचं साहित्य संमेलन होत आहे. विशेषतः मराठी भाषेला अभिजात जातीचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं साहित्य संमेलन असल्यामुळे तमाम मराठी जगतामध्ये याबाबत खूप उत्सुकता आहे आणि विचारप्रवरतनाचा काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल हा मला विश्वास आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठी साहित्य संमेलनाबाबत म्हणाले.
बीड प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जोर धरला आहे. या मुद्द्यावरून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधकांचा दबाव वाढत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे ते त्यांच्या कामाने आले होते आणि मी माझ्या कामाने आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही. परंतु सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही त्याआधी कॅबिनेटमध्ये काम वैगेरे सगळं आमची भेट झाली होती.
धनंजय मुंडे हे ज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधीही भेटू शकतात नी त्यांना कधीही भेटू शकतो. त्यांच्या राजीनामा संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित दादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे.