मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सरकार बदलल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेत बदल करण्यात येत आहेत. वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचे बदली सत्र सध्या सुरू आहे. बऱ्यापैकी वरिष्ठ पातळीवर फेरबदल केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रशासकीय यंत्रणेला शिस्तीत काम करण्याची सूचना केली आहे. महाराष्ट्रातील सरकारमध्ये लवकरच ई कॅबिनेट प्रणालीचा वापर होणार आहे. याशिवाय फडणवीस यांनी सर्व प्रशासकीय विभागांना कामांमध्ये गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केली आहे.
वेगवेगळ्या शासकीय विभागांच्या वेबसाईट आतापर्यंत अपडेट करण्यात येत नव्हत्या. आता या सगळ्या वेबसाईट अद्ययावत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनेक प्रशासकीय विभागांमध्ये नागरिक माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज करतात. सतत त्यांनी मागितली जाणारी कॉमन माहिती वेबसाईटवरच टाकून मोकळे व्हा, असेही फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खास प्रकल्प सुरू केला.
‘आपले सरकार’ला ऊर्जा
मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार पोर्टल सुरू केले होते. या पोर्टलवरून राज्यभरातील अनेक सेवा ऑनलाईन आले होत्या. त्यामुळे महत्त्वाचे दाखले, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लोकांना ऑनलाइन अर्ज करणे सोयीचे झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये ही सेवा काहीशी मंदावली. मात्र आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने आपले सरकार पोर्टलवरून मिळणाऱ्या सेवेच्या दर्जामध्ये वाढ करण्यात आला आहे. याशिवाय नव्याने काही सेवांचा समावेश देखील करण्यात आला आहे.
देवा भाऊंचे सरकार आल्यानंतर त्यांच्या टीम मधील अनेक विश्वासू सहकारी मंत्रालयामध्ये परतले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विश्वासू सहकाऱ्यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस सरकार पुढच्या पाच वर्षांमध्ये दमदार कामगिरी करेल यात शंकाच नाही. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मंत्रालयासह राज्यभरातील प्रशासकीय यंत्रणेला काहीशी सुस्ती आली होती. ही सुस्ती आणि आळस झटकून कामाला लागा, अशा मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच काम करणारे आहे. ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ या मंत्रावर देवेंद्र फडणवीस हे देखील काम करतात. त्यामुळेच राजकीय कारकीर्द सुरू झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या नावाभोवती कोणताही वाद नाही. उलट फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची चांगलीच पोलखोल केली. आता फडणवीस येत होता मुख्यमंत्री झाल्याने विरोधकांनाही धडकी भरली आहे. राज्यातील अनेक घोटाळ्यांचे पुरावे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आहेत. त्यामुळे आतापर्यंत विरोध करणारे अनेक जण त्यांची स्तुती करू लागले आहेत.
