महाराष्ट्र

Devendra Fadnavis : विधानसभेत नानांवर मुख्यमंत्र्यांची पिचकारी

Maharashtra Budget Session : फडणवीसांचा काँग्रेसवर खोचक टोला

Post View : 30

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलणाऱ्यांच्या यादीमध्ये नाना पटोलेंचं नाव नसल्याने विदर्भाचा आवाज दाबला जातोय, अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट पक्की ‘कोणी कोणाचा सगा नाही, सगळे एकमेकांचे वांगे खातात’. नाना पटोले आणि काँग्रेस यांच्यातली दरी बघून तर हेच म्हणावं लागेल ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ लोकसभेत काँग्रेसने बाजी मारली, पण विधानसभेत आली आणि पानिपत हो गया, आता हा पराभव कुणाच्या माथ्यावर मारायचा? काँग्रेसने आपली जुनी परंपरा कायम ठेवली आणि सगळं खापर नाना पटोलेंच्या डोक्यावर फोडलं. ‘नाना को नाना बनाने का प्लॅन’ तयार झाला आणि हर्षवर्धन सपकाळ यांना नवी हुकूमत मिळाली. पण तरीही नानांची ‘बुराई का सीझन’ थांबलाच नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, सगळ्यांनी ‘नाना की टांग खिंचाई’ मध्ये भाग घेतला.

‘सब गंगा में हाथ धोते हैं,’ आणि या गंगेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ‘हाथ साफ कर लिए’, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पाचवा दिवस, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलणाऱ्यांच्या यादीमध्ये फडणवीसांनी नाना पटोलेंवर असा टोमणा मारला की सभागृहात हंसी का डोज लागला आणि बाहेर गप्पांचा माहोल गरम झाला. ‘अरे, नाना पटोलेंचं नाव यादीत नाही? क्या बात है भाई, विदर्भ का आवाज काँग्रेसने कटिंग चाय के साथ गायब कर दिया क्या?’ असं म्हणत फडणवीसांनी नानांच्या जखमेवर ‘नमक-मिर्ची’ लावली. पण मजा तो तब आया, जेव्हा त्यांनी नानांच्या स्टाइलवर टिप्पणी केली – ‘कभी रंगबिरंगी कपडे, कभी पांढरे धोती-कुर्ता नानाभाऊ का मूड तो भाई समझ में ही नहीं आता’ त्यानंतर सभागृहात हास्याचा फटाका फुटला.

Shinde-Fadnavis : महायुतीचे दोन शिलेदार, विरोधकांवर भिडले घेऊन तलवार धारदार 

देवाभाऊंचा चिमटा

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत 50 हून जास्त आमदारांनी अपना-अपना राग आलापला. छगन भुजबळ, भास्कर जाधव, राम कदम, सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, रोहित पवार – सगळ्यांनी बोल बम केलं. कुणी सूचना दिल्या, कुणी टीका करून हल्ला बोल केला. फडणवीस म्हणाले, राधाकृष्णनजी ने राज्याचा भविष्याचा रोडमॅप सेट केला – रोजगार, रस्ते, शेतकरी, सबकुछ है भाई. पण या सगळ्या सिरियस माहोल मध्ये नानांचं नाव गायब राहिल्याने फडणवीसांनी मस्ती का चांस घेतला.

‘काँग्रेसने नानाभाऊ का माइक बंद कर दिया क्या? विदर्भ का आवाज कौन सुनेगा भाई?’ असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या घर की लड़ाईला चिमटा काढला. पण असली मजा तर नानांच्या ‘फॅशन शो’ वर आला ‘दो-तीन दिन रंगबिरंगी कपड्यांमध्ये स्वॅग मारते थे, लगा की नानाभाऊ किसी फिल्म के सेट पे हैं, आज पांढरे घालून आले, ये क्या स्टाइलबाजी है भाई?’ फडणवीसांचा हा टोमणा ऐकून सभागृह हास्याच्या तुफानात बुडालं. या टोल्याचा रोख जयंत पाटील किंवा महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांवर होता का, हे गुलदस्त्यातच राहिलं.

महायुतीचा मेगा प्लॅन

फडणवीसांनी पुढे सीरियस मोड ऑन करत सांगितलं, जनतेने महायुतीवर भरोसा ठेवलाय, आणि हा भरोसा आम्ही कामाने सार्थ करणार. रोजगार से लेकर शेतकऱ्यांचा विकास, सबकुछ प्लॅन में है. पण या सगळ्या मेगा प्लॅन मध्ये नानाभाऊंची मेगा गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. ‘विदर्भ का सुपरस्टार’ म्हणून ओळखले जाणाऱ्या नानांना बोलायला जागा नाही, तर ‘मतदारांचा आवाज कसा बाहेर येणार भाई?’ असा सवाल फडणवीसांनी उभा केला.

‘नाना का ना’ना’ झाल्यापासून काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. फडणवीसांनी तर या टोमण्याने मस्ती का डोज दिला आणि काँग्रेसला आयना दाखवला. आता नानाभाऊ रंगबिरंगी स्वॅग मध्ये परतणार की पांढऱ्या कपड्यांत शांत बसणार, हे पाहणं मजेशीर ठरेल. पण एक खरं फडणवीसांनी या टोमणा बाजी ने सभागृहात हंसी का धमाल आणि राजकारणात गप्पांचा मसाला भरला.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!