महाराष्ट्र

Devendra Fadnavis : जितेंद्र आव्हाडांना उत्तर देणे माझ्या लेव्हलचे नाही

Maharashtra : सनातनावर घात, फडणवीसांचा थंड पण धगधगता प्रतिघात

Author

सनातन धर्मावर टीका करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच फटकारत डिवचले आहे. आव्हाड यांना कोणतीच माहिती नसल्याचे फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सनातन धर्मावरील एका वक्तव्याने सध्या महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर थेट आणि ठाम प्रतिक्रिया दिली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मावर अत्यंत वादग्रस्त टीका करताना तो धर्म
दहशतवाद पसरवणारा असल्याचे विधान केले होते. सनातन धर्माने भारताचा नाश केला, असे आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानावर संतप्त प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आव्हाड यांना डिवचले.

फडणवीस म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांना ना सनातन धर्माची माहिती आहे, ना हिंदुत्वाची. केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी ते अशा प्रकारची विधाने करत आहेत. त्यांनी जे विधान केलं आहे, त्याला उत्तर देणं म्हणजे मी माझ्या स्तराच्या खालच्या गोष्टीत शिरणं, त्यांना उत्तर देणे माझ्या लेव्हलचे मी समजत नाही. त्यांच्याकडे कोणतीही वैचारिक पायाभूत समज नाही. फक्त लोकप्रियतेसाठी आणि समाजात फूट पाडण्यासाठी असे वक्तव्य केले जात आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या या स्पष्ट आणि प्रखर उत्तराने राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सनातन धर्म आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर चर्चेला जोर चढला आहे.

Sandip Joshi : नळातून गढूळतेची धार अन् जोशी बनले देवाभाऊंची तलवार 

मराठीच दाखवेल खरी ताकद

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे राजकारण संपवण्याचे वक्तव्य करत वातावरण तापवले होते. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, दुबे यांनी अशी विधाने करू नयेत. महाराष्ट्रात मराठी आणि अमराठी माणूस एकत्र आणि सुरक्षितपणे राहत आहे. येथे अशा प्रकारच्या वाद निर्माण करण्याची आवश्यकता नाही. काही लोक मुद्दामहून वाद निर्माण करत आहेत, पण मराठी जनता त्यांना निवडणुकीत त्यांच्या जागेवर बसवेल.

मुख्यमंत्री फडणवीसांनी हेही स्पष्ट केलं की, “राजकीय टीका ही मुद्द्यांवर असावी. धर्म, समाज, जात आणि भाषा यांच्याशी खेळणं हे धोकादायक ठरू शकतं. महाराष्ट्राच्या संस्कृतीत सहिष्णुता आणि विविधतेचा सन्मान आहे. त्यांचा संदेश स्पष्ट होता की, मतांसाठी समाजात फूट टाकणाऱ्या वक्तव्यांना महाराष्ट्र सहन करणार नाही.

Supreme Court : गुंता सुटला; प्रभाग रचना बदलणार, मतांचा खेळ रंगणार

मुंबईत महायुतीचा झेंडा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीविषयी बोलताना फडणवीसांनी आत्मविश्वासाने सांगितले की, महायुतीचाच झेंडा मुंबईत फडकारेल. राज ठाकरे काय किंवा कोणतीही छोटी मोठी पार्टी काहीही म्हणू शकते, पण शेवटी निर्णय मुंबईकर देतील. रामदास आठवलेही वेगळे लढले असते, तरी ते म्हणाले असते की महापालिकेवर आमचाच झेंडा लागेल. पण आता ते आमच्यासोबत आहेत, त्यामुळे त्या झेंड्याचं स्थान आमच्याकडेच आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरूनही मुख्यमंत्री फडणवीसांनी टोला लगावला. “ते डिनर डिप्लोमसी करा, नंतर ब्रेकफास्ट डिप्लोमसी करा, पुन्हा लंच डिप्लोमसी करा. पण जेव्हा पर्यंत तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर चालत राहाल, तोपर्यंत जनता तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी दिला.

देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाड, निशिकांत दुबे आणि उद्धव ठाकरे या तिघांनाही त्यांच्या वक्तव्यांवरून मुद्देसूद प्रत्युत्तर दिलं. सनातन धर्मासारख्या संवेदनशील विषयावर खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी योग्य शब्दांत खडसावले. त्यांच्या या शैलीने एकीकडे राज्यातील हिंदुत्वनिष्ठ मतदारांना संदेश दिला, तर दुसरीकडे सामाजिक सलोखा राखण्याचा स्पष्ट आग्रहही व्यक्त केला. राजकारणात मतांसाठी मर्यादा ओलांडणाऱ्यांना, हे उत्तर निश्चितच गप्प करणारे ठरले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!