महाराष्ट्र

Devendra Fadnavis : नव्या कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय आरोग्य सेवा केंद्र सज्ज

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने सरकारी रुग्णालये बळकट

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील आरोग्य सेवेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. नागपूर आणि विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये गट ड संवर्गातील 680 पदे भरली गेली.

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, दंत व आयुर्वेद महाविद्यालये तसेच संलग्न नऊ रुग्णालयांमध्ये गट ड संवर्गातील तब्बल 680 पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.

आरोग्य सेवेसाठी महत्त्वाचा टप्पा म्हणून या भरतीची दखल घेतली जात आहे. वर्षानुवर्षे रिक्त असलेली पदे भरून आता नागपूर आणि संपूर्ण विदर्भातील रुग्णांना अधिक सुसज्ज व तत्पर वैद्यकीय सेवा मिळणार आहे. या भरतीमुळे शासकीय रुग्णालयांची गती वाढेल आणि आरोग्य व्यवस्थेतील मूलभूत सुधारणा प्रत्यक्षात दिसू लागतील.

Bacchu Kadu : स्वराज्याच्या किल्ल्यातून राजधानीपर्यंत आवाज पोहोचणार का

वचनपूर्तीचा निर्णय

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार, जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये वर्षानुवर्षे रिक्त असलेली गट ड संवर्गातील 680 पदे भरण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती स्थापन करून भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो हॉस्पिटल, शासकीय दंत महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयांचा समावेश होता. भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली.

व्यवस्थेतील सुधारणा

गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेली गट ड संवर्गातील पदे भरल्यानंतर शासकीय रुग्णालयांमधील सेवांचे नवे पर्व सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आणि जलद सेवा देण्यासाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे, रुग्णसेवा अधिक कार्यक्षम होईल आणि सरकारी आरोग्य यंत्रणेला अधिक गतिमानता मिळेल. या निर्णयामुळे संपूर्ण विदर्भातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल. ही भरती केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रशासनाची संवेदनशीलता आणि ठोस कृती दर्शवते.

Devendra Bhuyar : पांदन रस्त्यांवर स्थगितीचा फटका

महाराष्ट्र आरोग्यदृढ

मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता ही मोठी समस्या होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटली आहे. राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राला नवसंजीवनी देणारा ठरेल. या भरतीमुळे नागपूर आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो रुग्णांना त्वरित आणि सक्षम आरोग्यसेवा मिळेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!