महाराष्ट्र

Belora Airport : देवाभाऊंच्या उपस्थितीत अमरावतीच्या आकाशात पूर्ण वेळ टेकऑफ

Amravati : मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात स्वप्नांना नवीन पंख

Author

अमरावती विमानतळाच्या गगनभरारीचा मुहूर्त ठरला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत, शहराच्या हवाई प्रवासाचा नवा अध्याय सुरू होणार.

अमरावती आता लवकरच आकाशात झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. विदर्भाच्या या महत्त्वाच्या शहरातील हवाई प्रवासाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येत आहे. अमरावती विमानतळ पूर्णतः कार्यान्वित झाला आहे. येत्या काही दिवसांतच येथून प्रवासी विमान सेवा सुरू होणार आहे. या नव्या युगाची सुरुवात झाल्याने अमरावतीच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्काला मोठी चालना मिळणार आहे. अमरावती विमानतळावर 16 एप्रिल रोजी पहिल्या प्रवासी विमानाचे उड्डाण होणार आहे.

माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकहित लाइव्ह सोबत बोलताना सांगितले होते की, अमरावती विमानतळ हे केवळ एक प्रकल्प नसून, शहराच्या विकासाचे मोठे स्वप्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे स्वप्न आता साकार झाले आहे. 16 एप्रिल रोजी अमरावती विमानतळाचे टेकऑफ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ऐतिहासिक क्षणाचा शुभारंभ होणार आहे.

Parinay Fuke : तस्कर, अधिकाऱ्यांवर येत्या काही तासात कारवाई; सीएमचे आदेश

बुकिंग सुरु

उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचीही या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असेल. अलायन्स एअरतर्फे 10 एप्रिलपासून अमरावती-मुंबई दरम्यानच्या प्रवासी सेवा तिकिटांचे बुकिंग सुरू होईल. सध्या आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच सोमवार, बुधवार आणि शुक्रवार ही सेवा उपलब्ध असेल. सकाळी 8.45 वाजता अमरावतीहून विमान मुंबईला रवाना होईल आणि 10 वाजता पोहोचेल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊन, 6.15 वाजता अमरावतीत परत येईल. भविष्यात वेळापत्रकात काही बदल होण्याची शक्यता आहे.

अमरावतीकरांसाठी 30 मार्च हा एक ऐतिहासिक दिवस ठरला होता. पहिल्यांदाच एटीआर-72 प्रकारच्या विमानाने यशस्वी चाचणी लँडिंग करून प्रादेशिक हवाई संपर्काच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे अमरावतीच्या हवाई प्रवासाचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे. माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला आहे. 2014 पासून ते यासाठी अविरत प्रयत्नशील होते. मात्र त्यांना अनेक राजकीय अडथळे पार करावे लागले.

Harshwardhan Sapkal : कुठे गेलेत सेलिब्रिटी? काँग्रेसचा संतापाचा पारा 

मेहनतीला यश

अखेर त्यांच्या मेहनतीला यश आले आणि अमरावतीकरांसाठी ही ऐतिहासिक सुविधा उपलब्ध झाली. अमरावती हे महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असलेले महत्त्वाचे शहर आहे. आता हवाई सेवेमुळे त्याच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे. स्थानिक नागरिकांसाठी प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि उद्योग, व्यापार तसेच पर्यटन क्षेत्रासाठीही नवी संधी उपलब्ध होईल. शहराच्या हवाई सेवेला नवा वेग मिळाल्याने अनेक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार याठिकाणी येण्यास इच्छुक असतील.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!