
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. निखिल फड नावाच्या तरुणासोबतच्या त्यांच्या जवळीकीमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. हातात बंदूक असलेले काही फोटो व्हायरल झाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक नाट्यमय वळण घडत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर निखिल फड याच्याशी असलेल्या कथित संबंधांवरून कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. बीड सरपंच हत्याकांडात त्यांचे सहकारी वाल्मीक कराड यांचं नाव आल्यानंतर चार मार्च 2025 रोजी मुंडेंना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. आता निखिल फड याच्यासोबतचे गाडीवर असलेले एनसीपी चिन्ह, जिममधील जवळचे फोटो व्हायरल झाल्याने नवीन आरोपांचा भडिमार सुरू झाला आहे. बीड पोलिसांच्या तपासाची मागणी जोर धरत आहे.
वाल्मीक कराड प्रकरणानंतर आता निखिल फड हा धनंजय मुंडेंसाठी नवा डोकेदुखी ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. बीड पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. निखिलच्या इंस्टाग्रामवर पिस्तुलासोबतचेही काही फोटो आहेत, ज्यामुळे त्याच्यावर गंभीर आरोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावर यापूर्वीच संतोष देशमुख हत्याकांडाच्या संदर्भात आरोप झाले होते, आणि आता निखिल फडचं नाव समोर येताच विरोधकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Raj Thackeray : मनसेच्या मुख्य ‘इंजिन’ चालकाकडून भैय्याजींबाबत ‘चेन पुलिंग’
राजकीय वर्तुळात खळबळ
निखिल फड आणि धनंजय मुंडे यांच्यातील जवळीक हे आता काही लपून राहिलेलं नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघेही जिममध्ये एकत्र वर्कआउट करताना दिसतात. धनंजय मुंडे यांनी निखिलच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो किंवा हातात हात घेऊन उभं असलेलं छायाचित्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण हे नातं फक्त मैत्रीचं आहे की त्यामागे काही राजकीय डावपेच आहेत? हा प्रश्न सध्या बीडमधील जनतेला पडलाय. निखिल फड याच्यासोबत पंकजा मुंडेंचेही फोटो असल्याने हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलं आहे.
वाल्मीक कराड प्रकरणाने धनंजय मुंडेंना आधीच बॅकफूटवर ढकललं होतं. संतोष देशमुख हत्याकांडात कराडचं नाव आल्यानंतर मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता निखिल फडच्या नावाने नवीन वाद उफाळून आल्याने विरोधकांनी पुन्हा एकदा मुंडेंवर टीकेची झोड उठवली आहे. निखिल फड हा मुंडेंचा नवा विश्वासू सहकारी असू शकतो, तर काहींना वाटतंय की हा विरोधकांचा मुंडेंना बदनाम करण्याचा नवा डाव आहे. बीड पोलिसांवरही दबाव वाढलाय, कारण निखिलच्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून त्याच्यावर गुन्हेगारी आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Atul Londhe : मुंबईत मराठी नको, मग तुम्हीच गुजरातला शिफ्ट व्हा