महाराष्ट्र

Dhananjay Munde: वैद्यकीय कारणामुळे दिला राजीनामा 

Santosh Deshmukh case: वाल्मिक कराडचा 'राईट हॅन्ड' म्हणून मुंडेंच्या संपर्कात 

Author

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्वतः मुंडे यांनी ही माहिती जाहीर केली आहे. 

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग हत्याकांडाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचे गंभीर परिणाम उमटू लागले. विशेषतः जेव्हा हत्येचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र संतापून उठला.

प्रकरणातील मुख्य आरोपींनी केलेल्या अमानुष अत्याचाराचे चित्रीकरण त्यांच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये केले होते. पोलिसांनी तपासादरम्यान मुख्य आरोपी महेश केदारच्या फोनमधून तब्बल 15 व्हिडीओ आणि 8 फोटो जप्त केले. या व्हिडीओंमध्ये सरपंच संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसते. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपींनी विजयाचा जल्लोष केला.

Maharashtra : फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका 

मोठा गौप्यस्फोट

धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. “द लोकहित लाइव्ह” सगळ्यात आधी हि बातमी देत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या वादळाला कारणीभूत ठरू शकतो.

विशेष म्हणजे, वाल्मिकी कराडचा राईट हॅन्ड म्हणून ओळखला जाणारा सौरभ नावाचा व्यक्ती धनंजय मुंडे यांच्या संपर्कात असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर हा व्यक्ती आढळला आहे. या माहितीमुळे आधीच वादात अडकलेल्या मुंडेंवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे.

“द लोकित लाईव्ह” ने हा धक्कादायक खुलासा केला असून, यामध्ये आणखी कोणते पुरावे आहेत? हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. हा नवा गौप्यस्फोट मुंडेंच्या राजकीय भविष्यासाठी धोकादायक ठरू शकतो का?

Maharashtra: भाजपकडून ठाकरे गटाला ‘कुछ मीठा हो जाये’

महाराष्ट्रात खळबळ 

संपूर्ण प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा हा स्वेच्छेने दिला गेला की जबरदस्तीने लिहून घेतला गेला? हा प्रश्न आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. तीन मार्चला रात्रीच मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आणि अखेर त्यांनी तो लिहून दिला, समोर आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला असून, हा राजीनामा दबावामुळे घेतला गेला का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणावर लागलं आहे. हा फक्त सुरुवात आहे की अजून कोणत्या मंत्र्यांवर गंडांतर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

राजीनाम्याच्या दोन बाजू

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडवला आहे. त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर (X) पोस्टमध्ये राजीनाम्याचे कारण ‘वैद्यकीय समस्या’ असल्याचे नमूद केले आहे. परंतु दुसरीकडे अर्थमंत्री अजित पवार यांनी हा ‘नैतिकता प्रधान निर्णय’ असल्याचे स्पष्ट केले. आता प्रश्न असा निर्माण होतो की धनंजय मुंडेंनी खरोखरच स्वतःहून राजीनामा दिला, की हा राजकीय खेळाचा भाग आहे?

धनंजय मुंडे यांनी आपली तब्येत बिघडल्यामुळे राजीनामा दिला, असे त्यांचे म्हणणे आहे. पण जर हा निर्णय नैतिकतेच्या आधारावर घेतला गेला असेल, तर तीन महिन्यांपासून ही नैतिकता कुठे होती? संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर लगेच राजीनामा का दिला गेला नाही? विरोधकांचा आरोप आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारने मुंडेंना वाचवण्यासाठी तीन महिने संरक्षण दिले आणि आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर “नैतिकता” आणि “वैद्यकीय कारण” या दोन गोष्टी पुढे आणल्या जात आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!