महाराष्ट्र

Devendra Fadnavis : पवारांचा खुलासा म्हणजे सलीम-जावेदची स्क्रिप्ट

Sharad Pawar : मुख्यमंत्र्यांच्या शरद पवारांवर 'कट टू कट' हल्ला

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या ‘खुलाश्या’ची तुलना थेट सलीम-जावेदच्या फिल्मी पटकथेशी करत जोरदार हल्ला चढवला. ईव्हीएमपासून ओबीसी प्रश्नापर्यंत टोलेबाजीचा वर्षाव करत त्यांनी विरोधकांच्या ‘शूट अँड स्कूट’ राजकारणावर थेट प्रहार केला.

नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या खुलाश्यावर असा टोलाचा सडाखा लगावला की, सभागृहात क्षणभर हशा पिकला तर क्षणभर गंभीरतेची कमान ताणली गेली. हे काही राजकारण नाही, तर सलीम-जावेदची मसालेदार कथा सुरू आहे. आणि आता ती कथा बंद व्हायलाच हवी, असा थेट हल्ला चढवत फडणवीसांनी ‘खुलासा’ हा फक्त फसवा आणि बनावट असल्याचं सांगितलं.

फडणवीस म्हणाले, तुम्ही देशाचे आदर्श नागरिक आहात, तर तुमच्याकडे असा प्रस्ताव घेऊन कोणी आलं तर तुम्ही तात्काळ पोलिसांकडे किंवा निवडणूक आयोगाकडे का गेलात नाही? की त्याचा राजकीय फायदा उचलण्याचाच विचार केला? ऑफर देणाऱ्याला काँग्रेस नेत्याला भेटवून दिल्याचा दावा तर अधिकच गंभीर आहे. याचा सरळ अर्थ होतो की, सगळे मिळून देशाविरुद्ध साजिश रचत आहेत.

Prakash Ambedkar : शरद पवारांच्या 160 स्वप्नांना वंचितांचा चिमटा

गोळी झाडा, लगेच पळा

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलं, ईव्हीएमवर सतत आरोप केले जात आहेत, पण निवडणूक आयोगाने चार वेळा खुला चॅलेंज दिलं, तरी कोणी ते हॅक करून दाखवू शकलं नाही. आयोग नोटिसा देतोय, पत्रं पाठवतोय, निमंत्रण देतोय, पण हे लोक ‘शूट अँड स्कूट’ धोरणानेच चालतात, गोळी झाडा आणि लगेच पळा.

शरद पवारांच्या एनसीपीकडून निघालेल्या मंडल यात्रेलाही फडणवीसांनी चिमटा काढला. ओबीसी समाजाची ताकद आता त्यांना लक्षात आली. पण 30 वर्षं त्यांनी या समाजाकडे पाठ फिरवली. योजना, लाभ, प्रतिनिधित्व, काहीच ओबीसींपर्यंत पोहोचवलं नाही. केवळ भाषणबाजी आणि राजकारण. आता जेव्हा ओबीसींचा रोष जाणवू लागला, तेव्हा यात्रा काढली जातेय. पण फक्त यात्रा काढून चालणार नाही, ठोस पावलं उचलावी लागतील, असा टोला त्यांनी लगावला.

Chandrashekhar Bawankule : राजकीय पोळी भाजून घ्यायचा काँग्रेसचा प्रयत्न

नाट्यमय राजकारण

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे चपखल तुलना करत म्हटलं, ओबीसींना संकट आलं की तुमची भूमिका नरवा-कुंजरवासारखी होते, दूरून बघायची पण मदत नको करायची. आता आठवण आली असेल तर ती केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतही दिसली पाहिजे.

फडणवीसांचा हा हल्ला फक्त राजकीय नव्हता, तर त्यात नाट्य, व्यंग आणि झणझणीत टोमण्यांचा मिलाफ होता.
एकीकडे त्यांनी पवारांच्या ‘खुलाश्या’ची तुलना सलीम-जावेदच्या फिल्मी स्क्रिप्टशी केली. तर दुसरीकडे ओबीसी प्रश्नावर जुने हिशेब चुकते करत ‘नरवा-कुंजरवा’ची उपमा दिली. यातून स्पष्ट होतं की, महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात पुढील काही दिवसात संवादापेक्षा प्रतिउत्तरांचा सामना अधिक रंगणार आहे.

या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पवारांचे ‘खुलासे’ आणि फडणवीसांचे ‘प्रतिउत्तर’ यामुळे आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला अजून रंगत चालला आहे. एकीकडे विरोधक निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी त्यांना पुराव्यासह मैदानात उतरण्याचं आव्हान देत आहेत. यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात नुसते वारे नाही, तर वादळे उठण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!