महाराष्ट्र

Eknath Shinde : मला हलक्यात घेणार त्याचा टांगा पलटी होणार 

Nagpur : उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाने राजकारणाला नवे वळण 

Post View : 20

Author

ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना नेते एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर आहेत. अशात शिंदे यांच्यामुळे विधानामुळे राजकरण तापले आहे. 

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या रोखठोक आणि आक्रमक वक्तव्यांमुळे सतत चर्चेत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर विरोधकांवर टीका करण्याची त्यांची शैली नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्यांनी मला हलक्यात घेतलं, त्यांनी आधीच अनुभवलं आहे की मी केवळ एक साधा कार्यकर्ता नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे जे मला अजूनही कमी लेखत आहेत, त्यांनी सावध व्हावं. ज्या लोकांना हा इशारा समजून घ्यायाचा आहे, त्यांनी समजावा. मी फक्त माझं काम करत आहे.

निशाणा नेमका कोणावर?

शिंदेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पाडून सरकार स्थापन करणाऱ्या शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.

शिंदे पुढे म्हणाले, “2022 मध्ये मला हलक्यात घेतलं गेलं आणि त्याचा निकाल काय लागला? तुमचा टांगा पलटी झाला. मी संपूर्ण सरकार बदललं आणि लोकांच्या मनातील सरकार आणलं. विधानसभेत मी पहिल्याच भाषणात सांगितलं होतं की, देवेंद्र फडणवीस यांना 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, आणि आता आम्ही 232 जागांवर पोहोचलो. त्यामुळे मला कमी लेखण्याची चूक कोणी करू नये, असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

जीवे मारण्याची धमकी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शिंदेंच्या कारला बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका ई-मेलद्वारे मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी तातडीने तपास करून बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील मंगेश वायल आणि अभय शिंगणे या दोघांना अटक केली.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “मी अशा धमक्यांना घाबरत नाही. याआधीही मला अनेकदा धमक्या आल्या, पण मी कधीच विचलित झालो नाही. लोकांची सेवा करायची, हेच माझं ध्येय आहे आणि मी त्यापासून मागे हटणार नाही!”

राजकीय वातावरण तापलं!

शिंदेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे? आगामी काळात याचा राजकारणावर काय परिणाम होईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!