देश

Prakash Ambedkar : मोदी-ट्रम्पच्या मैत्रीने तरुणांचे स्वप्न भंगले

H-1B Visa : भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रावर अमेरिकेचे वादळ

Post View : 28

Author

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच भारतावर 50 टक्के कर लादल्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता अमेरिकेने भारताला एक नवीन धक्का दिला आहे.

भारतीय तरुणांसाठी अमेरिका ही नेहमीच एक जादुई भूमी राहिली आहे. जिथे उच्च शिक्षण आणि चांगल्या नोकऱ्या मिळवण्याचे स्वप्न साकार होतात. पण हे स्वप्न आता धुक्यात हरवण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिजा प्रक्रियेत क्रांतिकारी बदल जाहीर केले आहेत. ज्यामुळे हे स्वप्न केवळ कल्पनेच्या कक्षेतच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता H-1B व्हिजासाठी अर्ज करताना चक्क 1 लाख अमेरिकी डॉलर (सुमारे 83 लाख रुपये) इतकी प्रचंड रक्कम भरावी लागणार आहे. हे बदल भारतीय आयटी तज्ञ आणि अभियंत्यांसाठी एक मोठा धक्का आहे, जे अमेरिकेत करिअर घडवण्याच्या आशेने रात्रंदिवस मेहनत करतात.

नव्या नियमांमुळे परदेशी कुशल कामगारांची भरती करणे अमेरिकन कंपन्यांसाठी एक महागडी गोष्ट ठरणार आहे. पूर्वी लॉटरीसाठी फक्त 215 डॉलर आणि अर्जासाठी (फॉर्म I-129) 780 डॉलर इतकेच शुल्क होते. पण आता हे शुल्क आकाशाला भिडणार आहे. ज्यामुळे लहान स्टार्टअप आणि छोट्या व्यवसायांना मोठा फटका बसणार आहे. व्हाईट हाऊसचे कर्मचारी सचिव विल शार्फ यांनी या बदलांचे समर्थन करत म्हटले आहे की, H-1B व्हिसा प्रणाली ही सर्वाधिक दुरुपयोग होणारी व्यवस्था आहे. अनेक कंपन्या कमी पगारात परदेशी कामगार आणून स्थानिक अमेरिकन कर्मचाऱ्यांना बाजूला सारतात, असा आरोप आहे.

Sharvari Tupkar : शेवटी तहसीलदार झाले जामिनावर फ्री बर्ड

रोजगार बाजारातील बदल

नव्या नियमांमुळे कंपन्यांना जास्त खर्च करूनच परदेशी कर्मचाऱ्यांची निवड करावी लागेल. ज्यामुळे फक्त अत्यंत प्रतिभावान आणि कौशल्यवान व्यक्तींनाच संधी मिळेल. हे एकप्रकारे अमेरिकेतील रोजगार बाजाराला अमेरिकन फर्स्टचा मंत्र देत आहे. पण यामुळे भारतीय तरुणांच्या स्वप्नांना मोठा धक्का बसणार आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि ट्रम्प यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, मोदींचे मित्र ट्रम्प भारताविरुद्ध एक मूक युद्ध लढत आहेत. प्रथम, अमेरिकेने भारताकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानकडे लक्ष वळवले आणि व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या लष्करप्रमुखांना जेवणासाठी बोलावले. त्यानंतर, अमेरिकेने भारतावर परस्पर शुल्कात 50 टक्के वाढ केली.

आता H-1B व्हिजा शुल्कात ही प्रचंड वाढ. ज्याचा भारतीय तंत्रज्ञान प्रतिभेवर सर्वाधिक परिणाम होईल. आंबेडकर यांनी याला ‘ट्रम्पचे भारताविरुद्ध मूक युद्ध’ असे संबोधले आणि मोदी हे त्याचे समर्थक आहेत, असे म्हटले आहे. 2024 मध्ये H-1B व्हिजासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या तब्बल 40 टक्क्यांनी घसरली होती. कारण अनेक उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज करत होते. ज्यामुळे व्यवस्थेत गोंधळ निर्माण होत होता. आता नव्या बदलांमुळे एका उमेदवाराला फक्त एकच अर्ज करण्याची परवानगी आहे, ज्यामुळे या वर्षीही अर्जांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. हे बदल एकप्रकारे व्हिसा प्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवत आहेत, पण त्यामुळे परदेशी कामगारांच्या संख्येत घट होण्याची भीती आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था या कुशल कामगारांवर अवलंबून आहे, तरीही हे नियम त्यांना दूर ढकलत आहेत.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!