महाराष्ट्र

Parinay Fuke : संविधानाचे वारसदार आंबेडकर स्मारकाच्या लोकार्पणासाठी पुढे

Bhandara : त्रिमूर्ती चौकात बाबासाहेबांचे विचार पुन्हा साकारणार

Post View : 29

Author

भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नवीनीकरण होऊन त्याचे लोकार्पण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केली.

भारताच्या इतिहासात ज्यांनी सामाजिक समतेची मशाल उजळवली, अशा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण देशात जयंती साजरी करण्यात येत आहे. 134 जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात आणि परदेशातही अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौकात आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांना अभिवादन करताना त्यांच्या कार्याची आणि विचारधारेची उजळणी झाली. या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित राहून केवळ अभिवादनच केले नाही, तर स्मारकाच्या नव्या स्वरूपाच्या दिशेने आश्वासक पावले टाकण्याची ग्वाही दिली.

त्रिमूर्ती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून सुद्धा काम रखडल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. अडीच वर्षांपूर्वी काम सुरू झाले, पण अद्याप पूर्ण झालेले नाही. हे स्मारक लवकरात लवकर नव्याने साकार व्हावे आणि त्याचे लोकार्पण सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. डॉ. फुके यांनी यापूर्वी दिल्लीत भूषण गवई यांची भेट घेऊन ही इच्छा प्रत्यक्षपणे त्यांच्यासमोर मांडली होती. आता गवई देशाच्या सरन्यायाधीश पदावर विराजमान होणार असल्याने, त्यांच्या कार्यकाळातच स्मारकाचे लोकार्पण होणे अत्यंत गौरवास्पद ठरेल, असे फुके यांनी नमूद केले.

Nagpur : धोक्याच्या छायेत नागपूरचा औद्योगिक पट्टा

नितीन गडकरींना विनंती 

लोकार्पणाचा कार्यक्रम हा भूषण गवई यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्यात होईल, असे सांगत फुके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही काम लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे. भूषण गवई हे अजून सर्वोच्च पदावर आहेत, तोपर्यंत स्मारकाचे लोकार्पण व्हावे, अशी ठाम मागणी त्यांनी समितीकडे केली. कार्यक्रमात बोलताना फुके यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानाचा गौरव केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या संदेशावर देश पुढे चालला आहे.

देशाचा प्रत्येक नागरिक संविधानाच्या आधारावर पुढे जातोय, ही बाबासाहेबांच्या दूरदृष्टीची फलश्रुती आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 मधील शपथविधीची आठवण करून देताना, फुके म्हणाले की, त्यावेळी मोदींनी संविधानाला नतमस्तक होऊन सांगितले होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच एक चहा विकणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. ही बाब केवळ भारतातील लोकशाहीची ताकद नाही, तर संविधानामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचलेल्या योजनांची सुद्धा साक्ष देणारी आहे.

Wardha : चार महिन्यांचे आमदार पण कामगिरी दमदार

डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे राजांच्या घरी नव्हे, तर मतपेटीतून राजा जन्म घेऊ लागला. ही लोकशाहीची खरी ताकद असून ती जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे फुके यांनी आवर्जून सांगितले. संविधानावर आधारित शिक्षण आणि समाजप्रबोधन होणे आवश्यक आहे. शासन देखील या दिशेने प्रयत्नशील आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!