राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जोरदार गाजत आहे. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस खासदारांनी आवाज उठवला आहे.
शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आता थांबलं पाहिजे. त्यांना दिलासा मिळालाच पाहिजे, अशा शब्दांत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी शासनाला पुन्हा एकदा सजगतेचा इशारा दिला आहे. भंडारा ग्रामीण भारत बंदच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना पाडोळे यांनी सातबारा कोरा करण्याची मागणी ठामपणे मांडली. हे निवेदन केवळ कागदावरच राहायला नको, याची सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी, असंही ते म्हणाले.
खरिप हंगाम २०२४-२५ संदर्भात सरकारी तत्त्वावरील भात खरेदी केंद्रांवर सर्व शेतकऱ्यांना संधी देण्याची गरज त्यांनी सांगितले. या निवेदनात भांडाऱ्यातील शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत मागण्या समाविष्ट करण्यात आल्या. रब्बी हंगामातील खरेदी मर्यादा वाढवून ती ३१ जुलैपर्यंत करावी. ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत २० जुलैपर्यंत वाढवावी, अशी ठोस मागणी करण्यात आली. यासोबतच रब्बी हंगामातील विक्रीचे पैसे आजतागायत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ते तात्काळ अदा करावेत, असा ठणकावाही या निवेदनात आहे.
Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांचा ‘रामशास्त्री’ सुट्टीवर, गुंडाराज सुरू
रस्त्यांची पुनर्बांधणी गरजेची
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हमीभावाची कायदेशीर हमी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, प्रति एकर धान्य किट यांसारख्या मागण्या आता शाब्दिक नव्हे, तर कृतीच्या प्रतीक्षेत आहेत. पडोळे यांचे नेतृत्व हे केवळ राजकीय न बोलता वास्तवाशी भिडणारे असल्याचं या मोर्चातून दिसून आले. केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणांविरोधात आवाज उठवत किसान सभेने स्पष्ट भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांसाठी मासिक १० हजार पेन्शन, पंपासाठी २४ तास मोफत वीज, थकित वीजबिल माफी, श्रमसंहिता रद्द करणे आणि स्मार्ट मीटर हटवणे या मागण्या आता तालुक्यापासून संसदपर्यंत पोहोचल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय महामार्ग व समृद्धी महामार्गामुळे बंद झालेल्या शेत रस्त्यांची पुनर्बांधणी, अतिक्रमित जमिनीवरील शेतकऱ्यांना मालकी पट्टे आणि सरकारी लाभ मिळावेत यासाठीही पडोळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. हे सर्व मुद्दे केवळ निवेदनापुरते न राहता, शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा लढा म्हणून पुढे यावेत, अशी लोकांची अपेक्षा आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेताना पाडोळे म्हणाले, कर्जमाफी ही कुणाची कृपा नाही, तर शेतकऱ्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्यांच्या या विचारांनी शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्याची लहर पसरली आहे. भंडारा जिल्हा काँग्रेस व किसान सभेच्या सहकार्याने शेतकरी प्रश्नांचा उहापोह करताना त्यांनी प्रशासनालाही स्पष्ट संदेश दिला. हा आवाज थांबणार नाही, तो दडपला तरी पुन्हा उठेल.
Sanjay Khodke : मनपाच्या रिकाम्या तिजोरीसाठी आमदाराने उठवला आवाज