महाराष्ट्र

Eknath Shinde : मिस्टर बिननी शिवसेना डस्टबिनमध्ये टाकली

Shiv Sena : बात निकली तो दूर तक जाएगी; शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल 

Author

विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना ‘मिस्टर बीन’ अशी उपमा दिली. 

महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे रोज नवं नाट्य. एकेकाळी जिवाभावाची असलेली शिवसेना आता दोन टोकांवर उभी आहे. एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांच्यात टोलेबाजीचा अखंड सिलसिला सुरूच आहे. विधान परिषदेच्या शेवटच्या दिवशीही या दोन गटांनी एकमेकांना डिवचायचा कोणताही संधी सोडली नाही. राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा जोरदार संवादफेक पाहायला मिळाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. मात्र, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘मिस्टर बिन’ या नावाने हाक मारत निशाणा साधला. ‘मिस्टर बिननी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती, पण आम्ही ती सुरक्षित बाहेर काढली’ असे वक्तव्य करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Maharashtra Legislative : न्यायासाठी झाडावर चढला इंजिनीअर शेतकरी

संविधानाची आठवण 

शिंदे यांनी यावेळी संविधान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावरून विरोधकांवरही ताशेरे ओढले. ‘विरोधकांना विकासाच्या मुद्यावर बोलायचं नाही, त्यांना फक्त संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सोयीस्कर आठवण होते. पण मर्चंट नेव्हीच्या अधिकाऱ्याला मारहाण झाली तेव्हा संविधान कुठे होतं? प्रदीप मोरेला मारलं तेव्हा संविधान कुठे होतं? केतकी चितळेला तुरुंगात टाकलं तेव्हा तुम्हाला संविधान आठवलं नाही का? असे प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

शिंदे यांचे भाषण पुढे अधिक आक्रमक झाले. ‘हनुमान चालीसा म्हटल्यामुळे राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकलं तेव्हा संविधान कुठे होतं? देवेंद्र फडणवीसांवर खोट्या केस टाकून तुरुंगात धाडायचं षडयंत्र रचलं, तेव्हा संविधान कुठं होतं? उद्योजकाच्या घरासमोर बॉम्ब पेरताना संविधान कुठं होतं? सचिन वाझे हा काही लादेन नाही असं म्हणणाऱ्या लोकांना संविधान आठवलं नाही का?’ असे अनेक प्रश्न उपस्थित करत शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तीन ग्लास पाणी

नारायण राणेंना अटक करताना, कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवताना, सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करताना संविधानाची आठवण का झाली नाही? असा सवालही त्यांनी केला. ‘हल्ली कोणालाही काहीही वाटलं की ते संविधान घेऊन फिरायला लागतात’ असा उपरोधिक टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

Maharashtra : IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा नवा पट

शिंदे यांनी पुढे शिवसेना पक्षाच्या आताच्या स्थितीवर जोरदार टीका केली. ‘बाळासाहेब ठाकरे नेहमी आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळे शिवसेना मोठी झाली. पण आज काही लोक ‘मिस्टर बिन’ झालेत. त्यांना शिवसैनिक म्हणजे कचरा वाटतो. पण त्याच कचर्‍यातून जेव्हा ऊर्जा निर्माण झाली, तेव्हा त्यांना हायव्होल्टेज शॉक बसला’ असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला.

त्यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती, आम्ही ती बाहेर काढली. पण डस्टबिनमधून बाहेर आल्यावर त्यांना घाम फुटला, तीन ग्लास पाणी प्यावं लागलं, चहा मागवावा लागला. कोणता चहा? वाघबकरी चहा’ मला जास्त बोलायला लावू नका, कारण ‘बात निकली तो दूर तक जाएगी’. असे म्हणत त्यांनी भाषण संपवले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!