महाराष्ट्र

Eknath Shinde : पायलट मी अन् कोपायलट फडणवीस, अजितदादा

Amaravati : एकनाथ शिंदेंच्या भाषणात टोले आणि विश्वास दोन्ही

Author

अमरावती विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिश्किल अंदाजात भाषण करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समन्वय दाखवत विरोधकांवरही जोरदार टीका केली.

अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा हा जरी भव्य ठरला असला, तरी त्याहून अधिक लक्ष वेधलं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मिश्किल, परंतु आक्रमक भाषणाने. सत्तेतील समन्वयाचे चित्र रेखाटतानाच, त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर फटकेबाजी केली. विकासाचे श्रेय कोणाचे, काम कुणी थांबवले आणि खरे पायलट कोण, यावरुन रंगलेली ही राजकीय खेळी उपस्थितांचे लक्ष वेधून गेली.

देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा 2014 ते 2019 दरम्यान विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र मध्ये आलेल्या सरकारने हे काम पूर्ण थांबवलं. आमच्या महायुतीच्या सरकारने 2022 नंतर पुन्हा हे काम वेगात सुरू केलं. मी त्यावेळी पायलट होतो आणि फडणवीस व अजित दादा को-पायलट. आता देवेंद्रजी पायलट आहेत आणि आम्ही को-पायलट, पण विकासाचे विमान तेच आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यातून सत्ताधाऱ्यांमधील समज आणि विरोधकांवरील टीका दोन्ही स्पष्टपणे उमटत होती.

Devendra Fadnavis : दूरदृष्टीने अमरावतीचं जागतिक रूपांतर

विकासविरोधी मानसिकता उघडी 

एकनाथ शिंदेंनी समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळ यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची यादी सादर करत विरोधकांना जणू इतिहासाची उजळणी घडवली. याच प्रकल्पांना विरोध करून विरोधकांनी केवळ अडथळे निर्माण केले. मात्र भाजप-शिंदे सरकारने हे सगळे प्रकल्प मार्गी लावून दाखवले, असे त्यांचे मत आहे.

आधीचं सरकार केवळ अडचणींचा पाढा वाचायचं काम करत होतं, त्यांना विकासाचे सूत्र माहीतच नव्हतं, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांची मानसिकता उघडी पाडली. त्यांचा हल्लाबोल केवळ टीकेपुरता मर्यादित नव्हता, तर त्यात केलेल्या कामांचा ठोस अहवालही होता.

Harshawardhan Sapkal : नागपूरच्या रस्त्यावर शांततेचा जयघोष

लाडकी बहिण योजना 

शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेवरही भाष्य करत विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही योजना बंद होणार नाही. टप्प्याटप्प्याने सर्व योजना राबवण्यात येतील आणि जनता दिलेला विश्वास वाया जाणार नाही.

एकनाथ शिंदे यांनी पालघरमध्ये नवीन विमानतळ उभारण्याची घोषणाही यावेळी केली. हे वक्तव्य म्हणजे फक्त आश्वासन नव्हे, तर आगामी राजकीय रणनितीचा भाग वाटत होता. त्यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले की, केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार हे विकासाच्या वेगाने धावणारे आहे आणि आगामी काळात आणखी अनेक प्रकल्प जनतेसमोर येणार आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!