
भंडारा जिल्ह्यात सध्या निवडणूक चुरशीची होत आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर हे रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील मैदानात उतरले आहेत.
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली. त्यावेळी आपल्याला साथ देणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना पुन्हा निवडणुकीत विजयी करून दाखवू असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी दिला होता. विधानसभेची निवडणूक बघता आसामच्या गुवाहाटीत साथ देणाऱ्यांसाठी शिंदे आता मैदानात उतरले आहेत. त्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्याची वेळ आल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: प्रचारात उतरलेले पहायला मिळत आहेत. भंडारा-पवनी मतदार क्षेत्राचे उमेदवार तथा आमदार नरेंद्र भोंडेकर यांना निवडून आणण्याचा चंग एकनाथ शिंदें कुटुंबाने बांधल्याचे दिसत आहे.
सत्ता स्थापनेच्या वेळी मदत करणारे शिंदे गटाचे आमदार नरेद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे 7 नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे येऊन गेले. त्यानंतर आताः 16 नोव्हेंबरला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदें भोंडेकरांचा प्राचर करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आपला शब्द पाळत असल्याचे बोलले जात आहे. महायुतीची सत्ता पुन्हा येण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे भंडारा-पवनी मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर जिंकून येणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे शिंदे पिता-पुत्रांनी भोंडेकरांना निवडून आणण्याची मोर्चा सांभाळला आहे. हेच चित्र सध्या भंडाऱ्यात आहे. Maharashtra Assembly Election Got Tough in Bhandara

शनिवार, 16 नोव्हेंबरला खासदार श्रीकांत शिंदें यांची भंडाऱ्यात जाहिर सभा आहे. शहरातील शास्त्री चौकात श्रीकांत शिंदे सकाळी 11 वाजता सभा घेणार आहेत. पिता एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील विरोधकांना आडव्या हाताने घेत आहेत. त्यामुळे खासदार शिंदे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘त्या’ माजी मंत्र्याच्या भरवश्यावर राहणे Congress पक्षाला पडणार भारी?
बापलेकांनी बांधलाय चंग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्वांत जवळचे आमदार म्हणून प्रसिद्ध असलेले नरेंद्र भोंडेकर यांच्या विजयाचा मार्ग सोपा केला जात आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहेत. तसा चंगच शिंदे यांनी मांडला आहे. ठाणेनंतर शिंदे यांचे लक्ष भंडाऱ्यावर सर्वांत अधिक आहे. पिता-पुत्राची प्रचारात सततची हजेरी सध्या हेच सिद्ध करीत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष थेट भोंडेकरांच्या मतदारसंघावर आहे. त्यामुळे भंडारा-पवनीची निवडणूक High Profile ठरत आहे.
तिसऱ्या टर्मसाठी तयार?
आमदार नरेंद्र भोंडेकर हे तिसऱ्या टर्मसाठी निवडणुकीला सामोो जात आहेत. त्यांनी भंडारा-पवनी भागातील मतदारांची योग्य नस पकडलेली दिसतेय. हिन्दू दलित मते आपल्याला कसे मिळतील? यांचे समीकरण त्यांना जमल्याचे सध्यातरी दिसतेय. सेवकांचा असलेला पाठिंबा, तेली-कुणबी समाजाची बऱ्यापैकी मतं त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे भोंडेकर यांचे प्राबल्य वाढले आहे. दलित मतांचे झालेले ध्रुवीकरण यामुळे त्यांचे मताधिक्य वाढल्याचे चित्र आहे. त्यात आमदार भोंडेकर यांना ठाणेकरांचा आशिर्वाद असाच मिळत राहिल्यास भोंडेकरांना निवडणूक जिंकणे अजिबात कठीण नाही, असे सांगण्यात येत आहे.