काँग्रेसच्या ईव्हीएमवर आक्षेप नाही तर मतदारांची संख्या कशी वाढली यावर आहे. तर यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, असे नाना पटोले म्हणाले.
राज्यात नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार आरोपाच्या फैरी सुरू केल्या. ईवीएमवरही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसने आता ईव्हीएमवरून पलटी मारत वाढलेल्या मतदार संख्येवर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मांडलेल्या भूमिकेनंतर ईव्हीएमवर आक्षेप नाही. तर वाढलेले मतदार आले कुठून हे स्पष्ट करावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. 1नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
आमचा ईव्हीएमवर आक्षेप नाही. परंतु निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत जे मताधिक्य वाढलं ते कसं वाटलं ? हे कोण लोक आहेत ? महाराष्ट्राची लोकसंख्या जेवढे नाही, त्यापेक्षा जास्त मतदार कुठून आले? हे निवडणूक आयोगाने आधी स्पष्ट करावे. त्याचप्रमाणे सायंकाळी सहा वाजता नंतर झालेली 76 लाख मते कोणत्या बुथवर झाली. त्याची व्हिडिओ फुटेज आम्हाला उपलब्ध करून द्यावे, अशी आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाकडे मागणी केल्यानंतर भाजपच्या पोटात दुखायला लागले. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तर भाजप नेते आमच्यावर टीका करतात, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
मंत्रिमंडळात भ्रष्टाचारी मंत्री
नाना पटोले म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्र बदनाम होत आहे. दिवसा ढवळ्या डाका टाकण्याचे काम होत आहे, यावर कुणीही बोलायला तयार नाही. आम्ही स्वतः या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. देशाच्या जनतेच्या लक्षात आणून देणार आहोत, असे पटोले म्हणाले. मंत्रीमंडळातील 65 टक्के मंत्री भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. या मंत्रीमंडळाला बरखास्त केले पाहिजे. या सगळ्या मंत्र्यांबद्दल पुरावे सहित माहिती मांडू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात ओबीसीची परिस्थिती वाईट आहे. सातत्याने ओबीसीवर अत्याचार कर आहे. भाजप ओबीसी समाजाला टार्गेट करत आहे. यापूर्वी भुजबळ यांनी भूमिका मांडली. भुजबळ यांना कसे अपमानित केले ते पहिले, असेही पटोले म्हणाले. क्रिमिलीयरची अट टाकून संविधानिक आयोग नेमला, पण ओबीसींच्या मुलांसाठी हॉस्टेल नाही. युपीएससी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समोर आलेली बाब गंभीर आहे. हा प्रश्न अधिवेशनात विचारू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.