महाराष्ट्र

BJP मध्ये प्रत्येक मंत्राकडे राहणार एक स्वीय सहाय्यक 

Chandrashekhar Bawankule यांनी दिली माहिती 

Post View : 56

Author

भारतीय जनता पार्टीमधील प्रत्येक मंत्राकडे एक स्वीयसहाय्यक देण्यात येणार आहे. हा पक्षाचा समन्वयक म्हणून कार्यरत होणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीची सत्ता पुन्हा स्थापन झाली आहे. त्यानंतर महायुतीकडून काही निर्णय घेण्यात आले. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही आदेश काढलेले आहेत. या सरकारमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असणे आवश्यक राहणार आहे. त्याकरिता पक्षाकडून प्रत्येक मंत्री महोदयांकडे एक स्वीय सहाय्यक हा पक्षाच्या कामासाठी ‘समन्वयक’ म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात महाराष्ट्र भाजपतर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. राज्यातील सरकार स्थापन होऊन दोन महिने पूर्ण झाली आहेत. या दरम्यान प्रदेशाध्यक्ष या नात्याने अनेक कार्यकर्त्यांनी काही सूचना माझ्याकडे केलेल्या आहेत. कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याकरिता विशेषत्वाने पक्षाकडून अनेकांना समन्वयकपदी संधी देण्यात येणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

काँग्रेसचे गटनेता पद Nana Patole यांच्या नशिबी अवघड

समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम

सरकारमधील पक्षाच्या प्रत्येक मंत्र्यांकडे पक्षाच्या कामासाठी ‘समन्वयक’ नियुक्त करण्यात येणार आहे.महाराष्ट्र भाजप तर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र जारी केले आहे. सुधीर देऊळगावकर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सहायक आहेत. मंत्र्यांकडील समन्वयकाचे नाव प्रदेश कार्यालयातील मुख्य सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. मंत्र्यांकडील विभागाच्या कामाची आणि कार्यालयात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आठवड्यातून 2 दिवस मुख्य समन्वयक सुधीर देऊळगावकर प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

हा निर्णय का घेण्यात आला? नवा प्रघात कशासाठी?भाजपच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष आक्षेप घेण्याची शक्यता जिल्ह्यातील विकासकामे आणि कार्यकर्त्यांची कामे सुलभ पद्धतीने झाली पाहिजे. यासाठी भाजपने समन्वयक पदाच्या नियुक्तीचा नवा निर्णय घेतला आहे. परंतु सरकारी पैशांनी कार्यकर्त्यांच्या कामाच्या स्वरुपात पक्षाचा प्रचार, प्रसार आणि विस्तार करण्यासाठी भाजपची रणनीती असू शकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!