महाराष्ट्र

Amaravati University : विद्यार्थ्यांसाठी पासपोर्ट टू सक्सेस

Vidarbha : संत गाडगे बाबा विद्यापीठासाठी कोटींच्या विकासनिधीला मंजुरी 

Author

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने 2025-26 साठी कोट्यावधींच्या भव्य बजेटला मंजुरी दिली आहे. हे केवळ आर्थिक आराखडा नसून शिक्षण, संशोधन आणि पायाभूत विकासाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची दूरदृष्टी आहे. 

ज्ञानाच्या अवकाशात नव्या भराऱ्या घेण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने 2025 – 26 या आर्थिक वर्षासाठी भव्य 255.72 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. हा केवळ आर्थिक आराखडा नसून विद्यापीठाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार केलेली दूरदृष्टी आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि अध्यापनाच्या नवीन उंचीवर पोहोचण्यासाठी हे बजेट विद्यापीठाच्या प्रत्येक घटकाला नवा वेग देणार आहे.

पार पडलेल्या महत्त्वपूर्ण अधिवेशनात कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. डॉ. व्ही.एच. नागरे यांनी सभेत बजेट सादर केला. तर प्रो-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे आणि इतर मान्यवर सदस्यांनी त्याला एकमताने पाठिंबा दिला. 192.36 कोटी रुपयांची अपेक्षित आय आणि 63.36 कोटी रुपयांची तूट असलेल्या या बजेटमध्ये महत्त्वपूर्ण आर्थिक वाटचाल आखण्यात आली आहे.

संशोधनाच्या सुवर्णकाळाची सुरुवात

बजेटमध्ये संशोधन कार्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे, नाविन्यपूर्ण संशोधन केंद्रे व जागतिक दर्जाच्या संशोधन प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. विज्ञान, अभियांत्रिकी, पर्यावरणशास्त्र, मानवशास्त्र आणि डिजिटल शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये विद्यापीठ नवीन संशोधन मोहीम हाती घेणार आहे.

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर त्यांना व्यावसायिक आणि उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी विद्यापीठाने कौशल्य विकास कार्यक्रम, नवा अभ्यासक्रम विस्तार, आणि डिजिटल लर्निंग उपक्रम हाती घेतले आहेत.

पायाभूत सुविधांचा कायापालट

विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी विद्यापीठाच्या पायाभूत विकासावरही विशेष भर देण्यात आला आहे. ग्रंथालयांचे आधुनिकीकरण, अत्याधुनिक स्मार्ट वर्गखोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे आणि तंत्रज्ञानाधारित अध्यापन पद्धती विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हरित आणि स्मार्ट तंत्रज्ञानाची जोड देऊन पर्यावरणपूरक सुविधा निर्माण केल्या जातील. नव्या वसतिगृहांच्या उभारणीसोबतच, क्रीडा संकुलाचा विस्तार आणि विद्यार्थ्यांसाठी आरामदायक व सुरक्षित परिसर तयार करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी संधीसोपान

बजेटद्वारे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी मोकळ्या केल्या आहेत. नवीन शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी भागीदारी, संशोधनासाठी प्रोत्साहन, तसेच स्टार्टअप आणि इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊ शकतील. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक करण्यासाठी परदेशी विद्यापीठांशी करार, उद्योगांशी संलग्नता आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेण्याची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना संशोधन, नवसंशोधन, आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी भक्कम आधार द्यायचा निर्धार केला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!