महाराष्ट्र

Nitin Gadkari : विदर्भातील वाळवंटात ‘मनोरंजनाचा मरिन ड्राईव्ह’

Nagpur : स्टुडिओ, सफारी आणि साहस पर्यटनाचं त्रिसूत्री स्वप्न

Author

विदर्भाच्या विकासाला आता चंदेरी दुनियेची जोड मिळणार आहे. नितीन गडकरींच्या पुढाकाराने एकता कपूर नागपूरात स्टुडिओ उभारण्यास तयार असून अंभोरा आणि अभयारण्यांद्वारे पर्यटनालाही नवे पंख मिळणार आहेत.

स्वप्नांना जिथं पंख मिळतात, तिथं उगम होतो नव्या युगाचा. विदर्भातल्या धरणीला आता ग्लॅमरचा स्पर्श मिळणार आहे आणि त्याचे शिल्पकार ठरणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. नागपूरच्या संस्कृती, संधी आणि सामर्थ्याला ‘एकता’चा स्पर्श मिळणार असून, ही गोष्ट केवळ मनोरंजनपुरतीच नाही, तर रोजगार आणि पर्यटन क्षेत्रात क्रांती घडवणारी ठरणार आहे.

नागपूरचा चेहरामोहरा आता बदलू पाहतोय आणि तो बदल घडवण्यासाठी पुढाकार घेतलाय देशाचे दळणवळण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. 20 जुलै रविवारी एका कार्यक्रमात त्यांनी मोठा खुलासा करत सांगितले की, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शिका आणि अभिनेता जितेंद्र यांची कन्या एकता कपूर नागपूरात भव्य स्टुडिओ उभारण्यास इच्छुक आहेत. गडकरी यांनी स्वत:च त्यांना नागपूरजवळील एक ठिकाण दाखवले असून, त्यांना ती जागा पसंतही पडली आहे. मुंबईपासून नागपूरची हवाई व रस्ते कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. त्यामुळे शूटिंग आणि लॉजिस्टिकसाठी हे स्थान आदर्श आहे. हा प्रकल्प निश्चितच फायदेशीर ठरेल, असं एकता कपूर यांनी स्पष्ट केलं, अशी माहिती गडकरींनी दिली.

Yashomati Thakur : पत्ते खेळणारे चालतात, पण चार पत्ते अंगावर येताच मारहाण करतात 

सिलिकॉन व्हॅली ऑफ सिनेमा’?

याआधीही तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भात ‘चित्रपटनगरी’ उभारण्याचा प्रयत्न केला होता. पण आता गडकरींच्या प्रयत्नांना प्रत्यक्षात एकता कपूरसारख्या दिग्गजांची साथ मिळाल्याने या प्रकल्पाच्या शक्यता अधिक मजबूत झाल्या आहेत. एका स्टुडिओच्या स्थापनेमुळे नागपूर आणि विदर्भातील कलाकार, तंत्रज्ञ, वेशभूषा-प्रसाधन करणारे, साउंड डिझायनर, केटरिंग सेवा, लॉजिस्टिक्स, ट्रान्सपोर्ट, हॉटेलिंग अशा असंख्य स्थानिक सेवा उद्योगांना काम मिळेल. विदर्भाची भूमी आता केवळ कृषिप्रधान नाही, तर ‘क्रिएटिव्ह हब’ म्हणूनही नावारूपाला येणार आहे.

विदर्भाचं ‘केरळ’

या कार्यक्रमात गडकरींनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. भंडारा जिल्ह्यातील अंभोरा बॅकवॉटर्सचा जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकास केला जाणार आहे. साहसी जलक्रीडा, रशियन हॉवरक्राफ्ट, जल-आधारित उपक्रम आणि काचेच्या तळाचे रेस्टॉरंटसह अंभोरा आता साहसी आणि कौटुंबिक पर्यटनासाठी आदर्श ठिकाण ठरणार आहे. या भागात पुलाच्या बांधकामानंतर पर्यटकांची संख्या वाढली आहे. आता आम्ही आंतरराष्ट्रीय सुविधा देणार आहोत. विदर्भाच्या सौंदर्याला आता जग पाहणार आहे, असं आत्मविश्वासाने गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari : जातीनं नाही, ज्ञानाने उजळतो दीप यशाचा

वाघांचा दरबार 

नागपूरपासून काही किलोमीटर अंतरावर अनेक अभयारण्ये आहेत, जिथं रोज वाघदर्शन होते. योग्य पॅकेजेस विकसित करून नागपूरला ‘टायगर टुरिझम कॅपिटल’ बनवू शकतो, असं मतही गडकरींनी मांडलं. गडकरी यांनी स्पष्ट केले की, पर्यटन क्षेत्रातील गुंतवणुकीपैकी 49 टक्के भांडवल हे थेट मानवी संसाधनांवर खर्च होतं. त्यामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगारनिर्मितीला गती मिळते. नागपूर आणि विदर्भाच्या नैसर्गिक आणि मानवी संसाधनांमध्ये अमर्याद क्षमता आहे.

नागपूर आणि विदर्भासाठी ही केवळ बातमी नाही, तर भविष्यातील दिशादर्शक आहे. एकता कपूरचा स्टुडिओ, अंभोरा पर्यटन केंद्र आणि टायगर सफारी, या सगळ्यांमुळे आता विदर्भ देशाच्या नकाशावर नव्या ओळखीने उभं राहील. आणि या बदलाच्या मुळाशी आहे, नितीन गडकरींची दूरदृष्टी आणि धडाडी.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!