महाराष्ट्र

Gadchiroli : जिथे स्वप्नही पोहोचले नव्हते, तिथे आली एसटी 

Devendra Fadnavis : नक्षलवादाच्या अंधारातून विकासाच्या प्रकाशाकडे 

Author

गडचिरोलीतील दुर्गम भागात आज एक ऐतिहासिक क्षण गाजला, जेव्हा 78 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एसटी बस पहिल्यांदा दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या गावांनी विकासाच्या नव्या युगात प्रवेश केला आहे.

स्वातंत्र्यानंतर तब्बल 78 वर्षांनी गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम कटेझरी गावात प्रथमच एसटी बसचा ध्वजावत स्वागत करण्यात आला. काँग्रेसच्या 65 वर्षांच्या राजवटीत दुर्लक्षित राहिलेल्या या आदिवासी पट्ट्यात, अखेर विकासाची गंगा वाहू लागली आहे. या परिवर्तनाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जाते. एकेकाळी अंधारात हरवलेला गडचिरोली आज प्रकाशाकडे वाटचाल करत आहे. कटेझरी गावात एसटी बस दाखल होताच संपूर्ण गाव आनंदात न्हालं. ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत या ऐतिहासिक क्षणाचे जल्लोषात स्वागत झाले. स्थानिक लोकांच्या चेहऱ्यावरचे हर्षोल्हास पाहताना, गडचिरोलीच्या परिवर्तनाची झलक स्पष्टपणे दिसून येत होती.

गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर फडणवीस यांनी या अतिदुर्गम भागातील खडतर वास्तवाला बदलायची जिद्द अंगी बाळगली. जिथे आधी नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे रस्ते बांधले गेले नव्हते, तिथे आज सीमेंट काँक्रीटच्या भक्कम रस्त्यांची जाळी विणली गेली आहे. छोटे-मोठे नाले, ओढे यावर मजबुत कल्व्हर्ट उभारण्यात आले आहेत. परिणामी, आता पावसाळ्यातही गावांचा तालुक्याशी संपर्क कायम राहत आहे.

प्रगतीपथाकडे वाटचाल

काँग्रेसच्या काळात नक्षलवादाच्या नावाखाली विकास थांबवण्यात आला होता. न रस्ते, न वीज, न वाहतूक व्यवस्था, गडचिरोलीला केवळ उपेक्षाच मिळाली. मात्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या सगळ्या अपूर्ण स्वप्नांना गती मिळाली. त्यांनी धैर्याने नक्षलवाद्यांना चोख उत्तर देत विकासाचे दरवाजे उघडले. फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे गडचिरोलीत आता जंगलाच्या पाड्यांपर्यंत पक्के रस्ते पोहोचले आहेत. अतिदुर्गम गावांमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाली आहे. छोटे गाव शहरांशी थेट जोडले गेले आहेत. विकासकामांच्या माध्यमातून नक्षल प्रभाव कमी होत आहे.

Nagpur Police : सीएमच्या गावात वाहतुकीसाठी अर्चित चांडक उतरले मैदानात

आज गडचिरोलीतील अनेक भागांमध्ये शाळा, आरोग्य सेवा, जलयुक्त शिवार, शासकीय सुविधा पोहोचल्या आहेत. गडचिरोलीच्या आदिवासी बांधवांना जगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प फडणवीस यांनी सत्यात उतरवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोलीसाठीचे योगदान फक्त पालकमंत्री म्हणून मर्यादित नाही तर, मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातही त्यांनी गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे आज गडचिरोली जिल्हा विकासाच्या नव्या प्रवाहात सहभागी झाला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!