महाराष्ट्र

Nagpur : महाराष्ट्रात होणार पहिला हेलिकॉप्टर स्वप्नांचा कारखाना 

Helicopter Manufacturing : विकासाच्या पंखांना मिळाले रोटर 

Share:

Author

नागपूरच्या भूमीतून आता आकाशाला नवे पंख मिळणार आहेत. राज्यात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर उत्पादनासाठी समर्पित प्रकल्प उभा राहणार असून, यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नव्या उंचीची भरारी मिळणार आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहर आता केवळ संत्र्यांसाठी नाही तर उड्डाणासाठीही प्रसिद्ध होणार आहे. गेल्या काही वर्षांत नागपुरात उद्योग, तंत्रज्ञान, वाहतूक आणि आरोग्य क्षेत्रात ज्या गतीने विकास होत आहे, त्यातूनच आता नागपूरचं नाव थेट आकाशात कोरण्याची तयारी सुरू झाली आहे. शहराच्या औद्योगिक प्रगतीला एक नवे, उंच भरारी देणारे पाऊल टाकण्यात आले आहे. नागपुरात उभारला जाणार आहे राज्यातील पहिलाच हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प.

आठ हजार कोटी रुपयांच्या भव्य गुंतवणुकीसह, मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागासोबत नागपुरात हेलिकॉप्टर निर्मितीसाठी सामंजस्य करार केला आहे. हा ऐतिहासिक करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडला. यावेळी उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सीईओ पी. वेलरासू, आणि मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांची विशेष उपस्थिती होती.

एव्हिएशन क्रांतीचं नवं केंद्र

नागपूर आधीपासूनच एरोस्पेस क्षेत्रात ‘फाल्कन’ जेटच्या सुटे भागांच्या निर्मितीद्वारे आपली ओळख निर्माण करत आहे. बोईंगसारख्या जागतिक ब्रँडचे देखभाल केंद्र (MRO) आणि इंडमारसारख्या कंपन्यांचे प्रकल्प येथे आधीच सुरू आहेत. त्यातच आता हेलिकॉप्टर उत्पादनासाठी समर्पित ‘सेन्टर ऑफ एक्सलन्स’ येथून सुरू होणार आहे. यामुळे नागपूर हे संपूर्ण भारतात एरोस्पेस उद्योगाचे भक्कम हब म्हणून उदयाला येणार आहे.

2016 पासून या कारखान्याचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. आठ वर्षांत एकंदर आठ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे सुमारे दोन हजार लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. नागपूर विमानतळालगत हे उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येणार असल्यामुळे विद्यमान पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक सपोर्ट याचा प्रकल्पाला मोठा लाभ होणार आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या राष्ट्रीय अभियानांना हे पाऊल प्रचंड बळ देणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, रोटरी-विंग हेलिकॉप्टर्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन, फ्लाइट टेस्टिंग अशा सर्व बाबींसाठी नागपूरचा हा केंद्र बिंदू ठरणार आहे.

Akola : वीज खोळंब्याचा कहर, आधी जुने शहर आता जठारपेठचा नंबर 

उद्योगाचे नवे दालन

या सामंजस्य कराराअंतर्गत नागपुरात उभारल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्पाचा उद्देश अत्यंत महत्त्वाचा आहे. एकूण आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पुढील आठ वर्षांत या प्रकल्पात करण्यात येणार आहे. 2016 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे थेट व अप्रत्यक्ष मिळून सुमारे दोन हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ज्यामुळे स्थानिक तरुणाईसाठी उद्योगाच्या नव्या दालनांची उघडण होणार आहे. हा प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या राष्ट्रीय अभियानांना चालना देणारा ठरणार आहे. नागपूर शहर हे भारतातील एरोस्पेस उद्योगाचे भविष्य घडवणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल.

फक्त स्वप्न बघणं नव्हे, तर ती प्रत्यक्षात आणण्याची धडपड ही नागपूरने पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. फक्त ‘विकासाचे वादळ’ नाही, तर ‘विकासाचं आकाश’ आता नागपूरच्या नावावर कोरणार आहे. हे केवळ हेलिकॉप्टरचे उत्पादन नव्हे, तर विदर्भाच्या भविष्याचे इंजिनियरिंग आहे. नागपूर आता केवळ मध्य भारताचे केंद्रबिंदू नाही, तर भविष्यातील एरोस्पेस क्रांतीचे पवित्र स्थळ म्हणून नावारूपास येण्यास सज्ज आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!