महाराष्ट्र

Bhandara Sand Mafiya : माफियाकडून तहसीलदाराला फाइव्ह स्टार सुविधा

Revenue Department : दोघांच्या निलंबनानंतरही शहाणपण नाही

Share:

Author

वाळू माफियांशी थेट संबंध असल्याचा ठपका ठेवत भंडाऱ्यातील महसूल विभागातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतरही काही अधिकारी शहाणे झालेले दिसत नाहीत.

गेल्या काही महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आदेश देताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर दोन महसूल अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं. यात एक उपजिल्हाधिकारी श्रेणीच्या उपविभागीय अधिकारी (SDM) आणि तहसीलदाराचा समावेश आहे. ‘पुढच्याला ठेच मागचा शहाणा’, अशी एक मराठीत म्हणत आहे. दोन अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर इतर महसूल अधिकारी सावध झाले असतील असे वाटत होते. मात्र भंडाऱ्यात असे चित्र नाही.

भंडारा जिल्ह्यातील एका तहसीलदाराची वाळू माफियांसोबत अति घनिष्ठ मैत्री झाली आहे. सरपंच असलेल्या या वाळू माफियानं तहसीलदाराच्या घरी फाइव्ह स्टार सुविधा पुरविण्यास सुरवात केली आहे. इतकेच काय, तर अगदी काही तासांपूर्वी वाळू माफियाच्या सांगण्यावरून तहसीलदाराच्या घरी केबल कनेक्शन जोडण्यात आलं. त्याचं पूर्ण बिल हा सरपंच वाळू माफिया भरणार आहे. खासगी वाहनातील इंधन, इंटरनेट, मोबाइलचं बिल, किराण्याचा खर्च, कुटुंबातील सदस्यांचे इतर किरकोळ खर्च देखील माफिया असलेला सरपंच करीत आहे.याची परतफेड म्हणून वाळू चे द्वार खोलून हे तहसीलदार सध्या ‘लाडका सरपंच’ योजना राबवित आहे.

तहसीलदार साहेबांना खुश ठेवण्यासाठी सरपंचाने आपल्या घराचा ‘मेकओव्हर’ केला आहे. त्यानंतर हे आलिशान घर वापरण्यासाठी तहसीलदार यांना दिले आहे. विशेष म्हणजे सतत संपर्कात असतानाही तहसीलदाराच्या या प्रतापाबद्दल भंडाराच्या जिल्हाधिकाऱ्यांना कसे लक्षात आले नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. महसूल विभागाची भंडाऱ्यातील एकूणच कामाची पद्धत पाहिली तर अभिनेता अशोक सराफ यांचा ‘आयत्या घरात घरोबा’ या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

Parinay Fuke : कमळाचं कनेक्शन पुन्हा जमलं; काँग्रेसचे दोन धुरंधर वळले

सरकारला वाकुल्या

वाळू माफियांविरोधात लगाम कसण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर धोरण अवलंबिले आहे. मात्र महसूल विभागातील काही अधिकारी सरकारच्या या भूमिकेला वाकुल्या दाखवत आपला खिसा भरण्यात गुंतले आहेत. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी स्वत: एसी केबीन बाहेर पडले. त्यांनी काही डेपो आणि वाळू घाटांची तपासणी केली. परंतु त्यांना ‘लाडका सरपंच’ राबविणाऱ्या या तहसीलदारांबद्दल कसे कळले नाही, असा प्रश्न महसूल विभागात उपस्थित केला जात आहे.

महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय वाळू माफिया एक कणही वाळू गायब करू शकत नाही. अलीकडेच महसूल निरीक्षकानं 60 पैकी 30 ट्रक वाळू परस्पर विकल्याचा प्रकार घडला होता. यासंदर्भात केवळ ‘द लोकहित लाइव्ह’ने वृत्त प्रकाशित केलं होतं. मात्र त्याचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एसडीओ आणि तहसीलदार यांना वाळू माफियांमुळं निलंबित व्हावं लागलं. कदाचित केबल जोडणी नसल्यामुळं ही बातमी ‘लाडका सरपंच’ योजना राबविणाऱ्या तहसीलदारांपर्यंत पोहोचली नसावी. पण आता त्यांनी माफियाच्या बिलावर केबल जोडणी घेतली आहे. त्यामुळं आता तरी त्यांनी माफियांसंदर्भात सरकार कोणती कारवाई करीत आहे, याच्या बातम्या बघाव्या अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वक्र दृष्टीला घाबरा

ज्योतिष्य शास्त्रात वाळू उद्योग मंगळ, शुक्र आणि शनी या तीन ग्रहांच्या अंतर्गत येतो. अलीकडेच 29 मार्चला शनीने राशी बदल करून मीन राशीत प्रवेश केला आहे. मंगळ सध्या कर्क या नीच राशीत आहे. शुक्र देखील शनी आणि राहु ग्रहासोबत मीन राशीतून प्रवास करीत आहे. शुक्र ग्रह हा ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो. राहु हा मोहात पाडणारा व नंतर मोठं नुकसान करणारा ग्रह असल्याचं ज्योतिषी सांगतात. त्यामुळं ऐशआरामाच्या नादात पडलेल्या तहसीलदारांना राहु आणि शनीची वक्र दृष्टी त्या एसडीओ आणि तहसीलदारांप्रमाणं अडचणीत आणणारी तर ठरणार नाही ना‌‌‌? अशी चर्चा आता महसूल विभागात आहे.

त्यातही शनी म्हणजे केलेल्या चांगल्या-वाईट कर्माचं फळ देणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. शनीला न्यायाची देवताही म्हटले जाते. न्यायाधीशही म्हटले जातं. शनीनं ना आपले वडील सूर्याला सोडलं ना महादेवांना. अशात आपल्याच खात्यातील व्यक्ती जर चुकीच्या मार्गावर चालत असेल तर शनीदेव कधी, कोणत्या रुपात देऊन दंडाधिकारी बनतील हे सांगता येणं अवघण आहे. त्यामुळं वाळू माफियांच्या नादी लागलेल्या तहसीलदारांनी महामार्गावरील त्या बोर्डावरील शब्द आठवावे ज्यावर लिहिलेले असते ‘दुर्घटना से देर भली’, असं बोललं जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!