महाराष्ट्र

पराभवानंतर Bacchu Kadu म्हणाले कोर्ट बदमाश

निवडणूक निकालानंतर Court मध्ये मागणार दाद

Share:

Author

निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदार बच्चू कडू यांनी न्यायालयाला बदमाश संबोधलं आहे. कोर्ट बदमाश आहे, तरीही निकालाविरुद्ध कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

सध्या राज्यभरात ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. अशात प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माजी आमदार बच्चू कडू यांनीही आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. कडू यांनी एका गावातील मतदानाच्या आकडेवारीचा उल्लेख टीका करताना केला आहे. या गावात ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथुन निवडणूक लढविली. या मतदारसंघातील एका गावात आपल्याला मतदान कमी झाल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. ब्राह्मणवाडा थडी येथील मतदान केंद्रावर आपल्याला भरपूर मतं मिळाली. येथे गेल्या निवडणुकीत 148 मतं मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत केवळ 60 मतं मिळाली. गावातील 125 लोकांनी आपल्याला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं आहे. प्रतिज्ञापत्रावर त्यांनी आपल्याला मतदान केल्याचं लिहून दिल्याचं कडू म्हणाले.

कोर्टाचा अवमान

बच्चू कछू म्हणाले, मतं कुणाला गेलं हे माहिती असणं सामान्य मतदाराचा अधिकार आहे. मतदान यंत्रासोबत वापरण्यात येणारं व्हीव्हीपॅट वरली जुगाराचा खेळ झाला आहे. त्यासाठी आपण न्यायालयात जाणार आहोत. कोर्ट बदमाश आहे. कोर्ट आम्हाला न्याय देईल असं वाटत नाही. तरीही आम्ही दाद मागणार आहोत. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. आता त्यात बच्चू कडू यांचाही समावेश झाला आहे. मात्र हा संशय व्यक्त करताना बच्चू कडू यांनी कोर्टावर संशय व्यक्त केल्यानं खळबळ उडाली आहे. न्याय व्यवस्थेबद्दल बच्चू कडू यांनी उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. इतकेच नव्हे तर कोर्ट आपल्याला न्याय देणार नाही, असंही नमूद करून ते मोकळे झाले आहेत.

विधानसभा निवडणूक निकालानंतर अनेकांनी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचं म्हटलं आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावातील नागरिकांनीही ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप केला. त्यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनानं गावात जमावबंदी लागू केली. उत्तम जानकर यांनी हा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर मारकडवाडी गावात ग्रामस्थांकडूनच फेरमतदान करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर गावात मोठा पोलिस फौजफाटा तयार करण्यात आला होता. अकोला जिल्ह्यातही प्रकाश पोहरे यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र कोणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं अकोल्यातील पोहरे यांचा प्रयत्न फोल पडला होता.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!