महाराष्ट्र

Sunil Mendhe : माजी खासदाराच्या प्रयत्नाने तुमसरला मिळाला रॅक पॉईंट

East Vidarbha : भंडारा-गोंदियाच्या अर्थव्यवस्थेला टॉप स्पीड

Post View : 29

Author

माजी खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नांना यश येत तुमसर रोड रेल्वे स्टेशन येथे रॅक पॉईंट मंजूर झाला. ज्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योगपतींना मोठा फायदा होणार आहे.

भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी खासदार सुनील मेंढे यांनी मोठे यश मिळवले आहे. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे रेल्वेच्या रॅक पॉईंटच्या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून याबाबत विनंती केली होती आणि प्रशासनाने यावर प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. तुमसर येथे रेल्वे विभागाकडून रॅक पॉईंट मंजूर झाल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक सुलभ होणार आहे.

खासदार हे पद नसले तरी त्यांनी आपली जबाबदारी सोडली नाही, उलट जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक कष्ट घेतले. शेवटी त्यांच्या अथक प्रयत्नांना फळ मिळाले आहे. तुमसर येथे गुड्स शेड म्हणजेच रॅक पॉईंट मंजूर करण्यात आला आहे. या सुविधेच्या उपलब्धतेमुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कृषी, व्यापार आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धान्य आणि भाजीपाल्याची उत्पादने बाहेर निर्यात केली जातात. येथे कृषी आधारित अर्थव्यवस्था असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांची गरज असते.

Waqf Amendment Bill : शब्दांच्या महासागरात विधेयकाची नौका

शेतकऱ्यांच्या अडचणी

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा धान उत्पादक म्हणून ओळखला जावा, अशी अपेक्षा आहे. येथील बहुतांश शेतकरी धान उत्पादनावर अवलंबून आहेत. वर्षभरात तब्बल तीन वेळा धानाची लागवड केली जाते, आणि इथला तांदूळ संपूर्ण देशभर वितरित केला जातो. मात्र, या संपन्न शेती क्षेत्रात अजूनही अनेक समस्यांचा भडका आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी मागणी मेंढे यांनी पत्राद्वारे केली होती.

जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी रॅक पॉईंट नसल्याने खत आणि बियाण्यांचा पुरवठा वेळेवर होत नव्हता. परिणामी शेतकऱ्यांना कधी कधी या गोष्टी महाग दरात विकत घ्याव्या लागत होत्या. तुमसर येथे रेल्वे विभागाकडून रॅक पॉईंट मंजूर झाल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक सुलभ होणार आहे. खत आणि बियाणे वेळेवर उपलब्ध होतील. व्यापारासाठी आवश्यक असलेली सामग्रीही सहजगत्या उपलब्ध होईल. यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.

Nagpur Railway : गोंदिया स्थानकावर बेकायदेशीर पैशांची तस्करी हाणून पाडली

प्रयत्नाला यश

शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांची ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. माजी खासदार सुनील मेंढे यांनी हा विषय संसद आणि प्रशासन स्तरावर वारंवार मांडला होता. त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर ही गरज मांडून रॅक पॉईंट मंजुरीसाठी प्रयत्न केले. भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनीही जागेचा सर्वेक्षण करून हा मुद्दा पुढे नेला होता. अखेर सर्व प्रयत्नांना यश येत तुमसर येथे रेल्वे विभागाने रॅक पॉईंट मंजूर केला आहे.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल माजी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रणवीत सिंह यांचे विशेष आभार मानले. जिल्ह्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी या सेवेसाठी नोंदणी करून फायदा घ्यावा, असे आवाहनही केले त्यांनी केले आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!