महाराष्ट्र

भंडाऱ्यातील बायपासचा श्वास Sunil Mendhe करणार मोकळा

वाहतुकीची कोंडी सुटणार New Year मध्ये

Post View : 44

Author

Views: 8765

भंडाऱ्यातील रस्त्याची समस्या बिकट झाली आहे. रस्त्याच्या या समस्येवर आता माजी खासदार सुनिल मेंढे यांनी पुढाकार घेतला आहे.

सततची होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळं भंडाऱ्यातील नागरिकांना मनस्ताप होत आहे. भंडाराकरांची ही समस्या सोडविण्यासाठी आता माजी खासदार सुनिल मेंढे यांनी पुढाकार घेतला आहे. भंडारा बासपासचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळं शहरातील वाहतुकीचा श्वास कोंडला आहे. हा श्वास मोकळ्या करण्याचा विडा आता मेंढे यांनी उचलला आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा चंग त्यांनी बांधला आहे.

भंडाऱ्यातील बायपास मार्गाचे काम पूर्ण झालेच पाहिजे. हा बायपाय लोकांच्या सेवेत तत्काळ लोकार्पित करता यावा, यासाठी माजी खासदार सुनिल मेंढे सातत्याने पाठपुरावा केला होता. निर्माणाधीन असलेल्या या बायपास मार्गाची त्यांनी स्वत: पाहणी केली. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व विकासक कंपनी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. या बायपास मार्गाचे तीन पदरी बांधकाम पूर्ण झाले आहे. हा मार्ग येत्या जानेवारी 2025 अखेरपर्यंत सुरू होईल, असा विश्वास प्रत्यक्ष भेटीनंतर माजी खासदार सुनिल मेंढे यांनी व्यक्त केला.

वाहनचालकांना Facility

गेल्या काही महिन्यांपासून भंडारा शहाराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. बायपास निर्मितीचे काम करण्यात येत आहे. भंडारा शहरातही प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. ही बाब लक्षात घेता माजी खासदार सुनिल मेंढे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणाला भेट दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. यावेळी मेंढे यांनी सुरुवातीपासून शेवटच्या टोकापर्यंतच्या कामाचं अवलोकन केलं.वैनगंगा नदीवर कोरंबी येथे सुरू असलेल्या पूल बांधकामाची माहिती देखील त्यांनी घेतली.

पाहणीदरम्यान सहा पदरी मार्गापैकी एका बाजूचे तीन पदरी काम पूर्ण झाल्याचं दिसलं. यावेळी माजी खासदार सुनिल मेंढे यांनी अधिकाऱ्यांकडून इतर तांत्रिक बाबी जाणून घेतल्या. त्यानंतर मेंढे म्हणाले की, भंडाऱ्यातील वाहतुकीची कोंडीनं जनतेची गैरसोय होत आहे. ही गैरसोय लक्षात आपण खासदार असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बायपास मार्गाची मागणी केली होती. कायमच भंडारा जिल्ह्याच्या पाठीशी गडकरी यांनी ही मागणी मान्य केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

Road होणार मोकळा

बायपास मार्ग जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र नदीवरील पुलाच्या डिझाइनमध्ये बदल करावा लागला. भिलेवाडा येथे आणखी एका नवीन पुलाची निर्मिती करावी लागली. यामुळे वेळ लागला. आता सहा पदरी मार्गापैकी तीन पदरी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. उरलेले तीन पदरीचे कामही मार्चमध्ये पूर्ण होईल. मात्र तोपर्यंत तयार झालेल्या तीन पदरी मार्गावरून वाहतूक सुरू करावी, असा प्रयत्न राहणार आहे.

रस्ता खुला करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली आहे. जानेवारी 2025 अखेरपर्यंत एका बाजुने वाहतूक सुरू होईल, अशी अपेक्षा सुनिल मेंढे यांनी व्यक्त केली. महामार्ग प्राधिकरण आणि विकासक कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. त्यांना यासंदर्भात निर्देश दिले असल्याचेही माजी खासदार सुनिल मेंढे म्हणाले. येणाऱ्या काळात लगेच मुजबी ते भंडारा शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू होईल. भंडारा-तुमसर-बालाघाट या महामार्गाचे काम सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

पाहणी प्रसंगी महामार्गाचे अधिकारी विलास इंगळे, प्रशांत शिरभाते, एन. के. रावत, सुधीर पवार, भंडारा पंचायत समिती सभापती रत्नमाला चेटूले, उपसभापती प्रशांत खोब्रागडे, भाजप शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, प्रशांत निंबोळकर, शैलेश मेश्राम, शिव आजबले, राजू भोजवानी, राजेश टीचकुले, विनोद भुरे, बंटी तांडेकर, प्रशांत पुरुषार्थी, सचिन तिरपुडे, डीम्मू शेख, फईम सय्यद, रमेश चोपकर, गुरु पटेल, रमेश साकुरे, अजय ब्राम्हणकर, चंद्रकला भोपे, श्रद्धा डोंगरे, माधुरी तुमाने, जया हिंगे, मनिषा भुते आदी उपस्थित होते.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!