महाराष्ट्र

Sunil Mendhe : माजी खासदार साहेब; तुम्हीही लागले या नादाला?

Bhandara BJP: दिल्लीत कार्यकाळ गाजविलेल्या माजी खासदारांना खेळायचीय गल्ली क्रिकेट

Post View : 26

Author

भंडारा जिल्ह्यातील भाजपची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीत 20 टक्क्यांची मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानंतर आता माजी खासदार सुनील मेंढे हे देखील सरसावले आहेत.

भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी भंडाऱ्यात लवकरच निवडणूक होणार आहे. निवडणुकीतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी माजी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीसाठी आपले नाव त्यांनी समोर केलं आहे. आपली ‘मन की बात’ अलीकडेच त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळं आतापर्यंत दिल्लीतील संसदेच्या बाकांवर बसणाऱ्या मेंढे यांना गल्ली क्रिकेट खेळण्याचे वेध लागल्याचं बोललं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एक नवी ‘मन की बात’ कानावर पडत आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष आपल्याना पुन्हा एकदा संधी मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी करीत आहेत. अशातच दिल्लीपर्यंत जाऊन आलेल्या मेंढे यांना जिल्हाध्यक्ष पदाचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळं हे पद मिळवण्यासाठी सुनील मेंढे यांना मोठी ताकद पणाला लावावी लागणार आहे. मात्र दिल्लीत काही नाही मिळालेल्या मेंढे यांना गल्लीच्या राजकारणातील पद हवेहवेसे वाटू लागल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.

Padma Award : देशभरातील कर्तृत्वाला पद्म पुरस्कारांचा मान

मैदानात उतरणार

भंडारा-गोंदियाचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी भाजपच्या भंडारा जिल्हाध्यक्ष पदासाठी आपलं नाव यावं, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राजकीय मैदानात त्यांनी आपले अनेक गडी उतरविण्याची तयारी केली आहे. त्यामुळं यंदा भंडारा भाजप जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. तितकीत रंगत आणि राजकीय डावपेचही या निवडणुकीत बघायला मिळणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपचे अनेक नेते आपापली रणनीती आखत आहेत. मेंढे यांनी कधीकाळी स्थानिक पदापासूनच आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. मात्र दिल्ली रिटर्न असलेल्या पराभूत माजी खासदाराला पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय व्हावेसे वाटत असल्याबद्दल सध्या भाजपमध्ये खमंग चर्चा रंगली आहे.

सुनील मेंढे यांच्या नावापुढं आता माजी खासदार असा शब्द जोडला गेला आहे. त्यांच्याकडं राज्यातील किंवा केंद्रातील कोणतंही पद नाही. अशात निदान जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांवरील आपली पकड कायम ठेवावी, अशी ईच्छा त्यांना झाली असावी, असं आता बोललं जात आहे. त्यातून ते स्थानिक राजकारणात पुन्हा सक्रिय होण्यास उत्सुक दिसत आहेत. मात्र त्यांना पद मिळण्याची शक्यता कितपत आहे यावर सध्या भाजपच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. मेंढे अखेरपर्यंत मैदान लढविणार असल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर मेंढे यांच्यासाठी भंडाऱ्यातील पक्षाची ही निवडणूक महत्वपूर्ण मानली जात आहे. या निवडणुकीसाठी त्यांना भाजप संधी देणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Prashant Padole : भंडाऱ्यात नव्या पुलावर पाण्याचा पूर

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!