महाराष्ट्र

साहेब.. Bhandara Zilla Parishad बाबत आता फोन लावाच

विषय समिती सभापतिपद निवडणुकीवर महायुतीचं भवितव्य

Post View : 32

Author

राज्यात महायुतीची घोडदौड सुरू आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात महायुतीवर विरजण पडण्याचे चित्र निर्माण झालं आहे. जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापती निवडणुकीवर आता महायुतीचं भवितव्य अवलंबून आहे.

भंडारा जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतिपदाची निवडणूक शुक्रवार, 7 फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पाच सदस्य गायब झाले आहेत. यात भाजपच्या एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील चार सदस्यांचा समावेश आहे. उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतरही केवळ खुर्चीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक काही नेते महायुतीला खटाईत टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. या निवडणुकीपूर्वी एका नेत्यानं महायुतीचा धर्म न पाळला गेल्यास पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना फोन लावण्याची धमकीच दिली होती. मात्र आता हा फोन लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळं साहेब तुम्ही फोन लावाच. आम्ही सांगतो की, महायुतीचा धर्म कोण पाळत नाही, अशी आक्रमक भावना व्यक्त केली जात आहे.

राज्यातील महायुतीमध्ये भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोबत आहे. हे तिघेही एकमेकांच्या हातात हात घालून सत्ता चालवित आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यात काही नेते आपल्या स्वार्थासाठी महायुतीला धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचं बोललं जात आहे. याच नेत्यांनी जिल्हा परिषदेतील पाच सदस्यांना गायब केलं आहे. विशेष म्हणजे यात भाजपचा एक सदस्य हाताशी धरला आहे. परिणामी भाजपमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आम्ही महायुतीचा धर्म पाळायला आणि तुम्ही आमचीच ‘फिल्डिंग’ लावायची अशी भावना महायुतीमधील पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

गृह राज्यमंत्र्यांनी जाणल्या On Duty 24 तास राहणाऱ्या खाकीच्या वेदना

 

पुढची वाटचाल ठरणार 

 

विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीवर भंडारा जिल्ह्यात महायुतीची पुढील वाटचाल ठरणार आहे. महायुतीमधील कोणीही एकमेकांशी दगाफटका केला, तर त्याचे नक्कीच पडसाद उमटणार आहेत. धोका झाल्या महायुतीमध्ये तणाव निर्माण होईल असंच चित्र आता निर्माण झालं आहे. भंडारा जिल्ह्यातील महायुती दोन दिग्गज नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळत टिकवून ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि भाजपचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके हे ते दोन नेते आहेत. या दोन्ही नेत्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत रात्रंदिवस एक करीत महायुतीसाठी यश खेचून आणलं. भंडारा जिल्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचाही गृ़हजिल्हा आहे.

खासगी बसवाल्यांचे Nagpur Bus Stand येथे पार्क अॅन्ड चील

नाना पटोले यांना आपल्याच गृहजिल्ह्यात आपलं अस्तित्व दाखवून देणं स्वाभाविकपणं गरजेचं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद काँग्रेसकडं खेचून त्यांनी काही प्रमाणात यश मिळवलं. आता महायुतीत मिठाचा खडा पडावा असं महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना वाटत आहे. विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत वाद व्हावे, अशीही महाविकास आघाडीची ईच्छा आहे. एकदा का भंडाऱ्यात महायुती तुटली की त्याचा फायदा राज्यस्तरावरही महाविकास आघाडीला घेता येणार आहे. त्यामुळं महायुती टिकवून ठेवण्याची कसरत भंडाऱ्यातील सर्वच नेत्यांना करावी लागणारी आहे. केवळ काही खुर्च्यांसाठी महायुती धोक्यात येणार असेल तर अशावेळी अनेकांना त्यागाची तयारी ठेवावी लागणार आहे. हा धर्म पाळला जाणार नसेल तर साहेब तुम्ही फोन लावा आता आम्ही वरिष्ठांशी बोलतो, अशी तयारी अनेकांची आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!