महाराष्ट्र

Maoists Surrender : क्रांतीच्या भ्रमातून संविधानाच्या सत्याकडे

Police Operation : भूपतीच्या शरणागतीने गडचिरोलीला नवजीवन

Post View : 43

Author

एकेकाळी माओवाद्यांच्या ताब्यातील जिल्हा म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली आता हळूहळू हिंसाचाराच्या अंधारातून बाहेर पडत, विकासाच्या उज्ज्वल दिशेने वाटचाल करत आहे.

देशाच्या अंतर्मनात खोलवर रुजलेला माओवाद्यांचा विषारी झाड आता उन्मळून पडताना दिसतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दृढ निश्चयानुसार, पुढच्या वर्षी म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत हा माओवाद पूर्णपणे संपुष्टात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एकेकाळी आठ ते दहा जिल्ह्यांमध्ये पसरलेला हा हिंसेचा सावटा आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या जिल्ह्यांपुरताच राहिला आहे. आता गडचिरोलीत घडलेली घटना म्हणजे या लढाईतील एक महाकाय विजय. माओवादी चळवळीचा पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटीचा प्रमुख नेते मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली. ही घटना 14 ऑक्टोबर दक्षिण गडचिरोलीतील घनदाट जंगलात, छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या हद्दीत घडली.

गडचिरोलीच्या इतिहासात ही सर्वांत मोठी सामूहिक शरणागती मानली जातेय. जणू काळ्या ढगांआडून सूर्यकिरण बाहेर पडले. या शरणागतीने महाराष्ट्र सरकारच्या माओवादविरोधी मोहिमेला अभूतपूर्व बळ मिळालं आहे. एकूण 60 माओवाद्यांनी, ज्यात भूपतीसारखा प्रमुख चेहरा सामील आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर हात उंचावले. त्यांनी एके-47 रायफलसह इतर शस्त्रे सरकारच्या स्वाधीन केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी शरणागतांच्या हाती भारतीय संविधानाची प्रत दिली आणि सांगितलं, संविधानाद्वारेच खरा समतेचा मार्ग उघडतो. भूपतीने मुख्यमंत्र्यांसमोरच शरण येण्याची अट घातली होती, जी पूर्ण झाली. या ऐतिहासिक प्रसंगानंतर फडणवीसांनी गडचिरोली पोलिसांच्या उत्कृष्ट कार्यासाठी एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. भूपतीचं मुख्य काम हल्ले नव्हे, तर संघटना बांधणी आणि माओवादी विचारांचा प्रचार करणं होतं.

Ravikant Tupkar : निवडणूक आयोगाचा कारभार म्हणजे लोकशाहीवर हल्ला

ब्रेनवॉशचा थरारक अनुभव

आता या 60 जणांनी हिंसेचा मार्ग सोडल्याने माओवादाला जबरदस्त धक्का बसला आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर एका युवकाची कहाणी समोर आली आहे. जी माओवादी चळवळीत सामील होण्यासाठी कसे ब्रेनवॉश केलं जायचं याचा थरारक वर्णन करते. हरियाणातील हा युवक गेल्या 26 वर्षांपासून माओवादी आंदोलनात सक्रिय होता. 1998 मध्ये, जेव्हा तो सहावीत होता, तेव्हा हरियाणातील जेएनयू जवळील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थी गावात येऊन नाटकं दाखवायचे. भगतसिंघ, अश्फाकुल्ला खान, राजगुरू यांच्या क्रांतिकारी जीवनावर आधारित ही नाटकं पाहून तो प्रभावित झाला. या देशातील साम्राज्यवादी कंपन्या आताही आयात-निर्यात आणि टॅक्सच्या नावाने पैसे लुटतात, काळे इंग्रज आले आहेत, त्यांना हाकलून जनतेचं राज्य आणावं, असे विचार त्यांनी रुजवले.

युवक सांगतो, भगतसिंघासारखी क्रांती पुन्हा करावी लागेल असं वाटलं आणि मी चळवळीत उडी घेतली. पण 2014 नंतर रोहित वेमुलाच्या प्रकरणाने त्याच्या आयुष्यात खळबळ उडाली. गडचिरोलीत वन हक्क कायदा, पाचवी आणि सहावी अनुसूची वाचली तेव्हा त्याला जाणवलं की, जे अधिकार शस्त्रांनी मागत होतो, ते संविधानाने दिले आहेत. आधी आम्ही संविधानाला मानत नव्हतो. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेलं नाही, इंग्रजांकडून घेतलं असं वाटायचं. राजेत दीक्षितांच्या भाषणातून 245 कलमं ब्रिटिशांकडून घेतली असल्याचं ऐकलं, असं तो म्हणतो. रोहित वेमुलाची केस समजली तेव्हा खरं संविधान उघड झालं. शस्त्रांनी घेतलेलं कोणी हिसकावून घेईल, आमचे दहा-बारा सहकारी मारले गेले. आदिवासींवर दोन्ही बाजूंचा परिणाम होतो. संविधान लागू केलं तर किती कार्यकर्ते वाचतील? मी निस्वार्थपणे काम करतो, घर सोडलं होतं. पण शस्त्रे मागे सोडली. देशासाठीच काम करायचं होतं, असे त्याने सांगितलं. ही कथा ब्रेनवॉशपासून संवैधानिक जागृतीपर्यंतचा प्रवास दाखवते.भूपतीसारख्या नेत्याच्या शरणागतीने माओवादी संघटना कमकुवत झाली आहे. सरकारच्या पुनर्वसन धोरणांमुळे अनेकजण मुख्य प्रवाहात येतायत.

Sujat Ambedkar : फक्त नारे नव्हेत, विचारांवरच खरी सत्ता

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!